उस्मानाबादी शेळ्यांचा यशस्वी जोपासलेला फार्म

परभणी शहरापासून नजीक पारवा शिवारात सतीश रन्हेर व सुधाकर भोपाळे दोन मित्रांनी एकत्र येत भाडेतत्वावरील क्षेत्रात अर्ध बंदिस्त शेळीपालन व्यवसाय यशस्वी केला आहे.
Goat rearing and fodder arrangement
Goat rearing and fodder arrangement
Published on
Updated on

परभणी शहरापासून नजीक पारवा शिवारात सतीश रन्हेर व सुधाकर भोपाळे दोन मित्रांनी एकत्र येत भाडेतत्वावरील क्षेत्रात अर्ध बंदिस्त शेळीपालन व्यवसाय यशस्वी केला आहे. सखोल अभ्यास, शास्त्रीय ज्ञान अवगत करीत व्यवस्थापन चोख ठेवण्यासह राज्यातील शेळी उत्पादकांचे नेटवर्क ठेवत ज्ञान-माहितीचे प्रभावी ‘प्रमोशन’ व विक्री व्यवस्थाही सक्षम केली आहे. परभणी शहरापासून चार किलोमीटरवर परभणी-पाथरी राष्ट्रीय महामार्गालगत पारवा शिवारात सतीश गोविंदराव रन्हेर व सुधाकर भोपाळे या दोघा मित्रांचा शेळीपालन फार्म प्रसिद्ध आहे. वर्षभराच्या कराराने भोपाळे यांच्या मित्राची पाच एकर जागा त्यांनी त्यासाठी भाडेतत्वावर घेतली आहे. सतीश यांचे गोविंदपूरवाडी (ता..परभणी) हे गाव असून एमए.(इतिहास), डी. एड पर्यंत शिक्षण झाले आहे. त्यांची दीड एकर जमीन आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते नोकरीच्या शोधात होते. मात्र २०१३ मध्ये अधिक विचारांती त्यांनी शेळीपालनाकडे वळायचे ठरवले. १७ शेळ्या खरेदी केल्या. त्यातून फायदाही होत होता. परंतु फिरस्ती पद्धतीने शेळीपालनात अडचणी येऊ लागल्या. दरम्यान २०१४ मध्ये सतीश पोलिस दल सेवेत रुजू झाले. मात्र व्यवसाय थांबवला नाही. भोपळे यांचा हॉटेल व्यवसाय आहे. फार्मची जबाबदारी सतीश यांचे वडील गोविंदराव व सुधारक पाहतात. नोकरी सांभाळून सतीशही दररोज किंवा सुट्टीच्या काळात काम करतात. दोन मजूरही तैनात केले आहेत. शेळीपालनातील बाबी

  • रन्हेर यांनी राज्यभरातील यशस्वी शेळीपालकांकडे भेटी देऊन अनुभव जाणून घेतले.
  • सन २०१६ मध्ये उस्मानाबादी जातीच्या ४० शेळ्या व दोन बोकड घेतले. आधुनिक पद्धतीनेभोपाळे शेळीपालन फार्म उभारला. अर्ध-बंदिस्त पद्धतीची रचना केली.
  • ९० ते ९५ शेळ्या. उस्मानाबादी व आफ्रिकन बोअर संकर.
  • फलटण येथील निंबकर फार्ममधून आफ्रिकन बोअर बोकड खरेदी केला. या संकरित शेळ्यांना चारा तुलनेने कमी लागतो. शिवाय उस्मानाबादीपेक्षा वजन १० ते १५ किलोने जास्त असते.
  • एकूण क्षेत्रापैकी दहा गुंठ्यात कुंपण. त्यात एका बाजूला २५ बाय ६० फूट आकाराचा जमिनीपासून साडेतीन फूट उंचीवर लोखंडी, लाकडी पट्ट्याचा वापर करून प्लॅटफॉर्म. त्याला टीन पत्र्याचे निवारा कुंपण. शेळ्या, बोकड, पिल्लांसाठी वेगवेगळ्या कप्पे. नळाच्या तोट्या प्लॅस्टिकच्या टोपलीत सोडून प्रत्येक कप्प्यात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था.
  • हवा खेळती राहण्याची व्यवस्था. तापमान कमी करण्यासाठी चारही बाजूंनी शेडनेट.
  • प्लॅट फार्ममुळे गोठा स्वच्छ करण्याचे काम सोपे होते. बाहेरील मोकळ्या जागेत चारा-पाण्याची व्यवस्था.
  • सर्व शेळयांना ‘इअर टॅगिंग’ व क्रमांक. त्यानुसार प्रत्येक शेळीच्या माहितीची नोंद.
  • चारा व्यवस्थापन

  • दोन एकरांत ओल्या चाऱ्याची व्यवस्था. यात मका, दशरथ गवत, मेथी घास, शेवरी आदींची लागवड. एक- दीड एकरांत सोयाबीन.
  • तीन एकरांत खाद्य साठवणूक, सोयाबीन, तूर भुश्‍शाचे मिश्रण, कडबा कुट्टीसोबत गहू, मका आदी धान्यांचा भरडा. मुरघास तसेच हायड्रोपोनिक चाऱ्याचा वापर.
  • सकाळी कोरडा चारा. त्यात कडबा कुट्टी, सोयाबीन, तूर यांचा भुस्सा, भुईमुगाचा पाला.
  • सकाळी ११ ते २ या वेळेत पडीक जमिनीवरील झाडाझुडपांमध्ये चरण्यास सोडले जाते.
  • संध्याकाळी उपलब्ध हिरवा चारा. रात्री प्रत्येकी २०० ग्रॅम विविध धान्यांचा भरडा.
  • शेळीपालन व्यवसायात स्वच्छता आणि लसीकरणाला अत्यंत महत्त्व आहे. त्यादृष्टीनेधनुर्वात, घटसर्प, आंत्रविषार, बुळकांडी, लाळखुरकत, गोट पॉक्स, ब्रुसेल्स आदी आजारांना प्रतिबंध करण्यासाठी दरवर्षी पावसाळ्यापूर्वी तसेच हिवाळ्याच्या प्रारंभी लसीकरण.
  • विक्री व्यवस्था रन्हेर म्हणाले की दोनहजार ते अडीचहजार शेळीपालकांचे नेटवर्क उभारले आहे. सोशल मीडिया तसेच रस्त्यालगत फार्म असल्याने विक्री व्यवस्था सक्षम झाली आहे. व्यापारी तसेच जिल्ह्यातील शेळी पालक थेट फार्मवरुनच खरेदी करतात. गरजेएवढ्या शेळ्या ठेऊन उर्वरित विक्री होते. बकरी ईद निमित्त बोकडांची मोठ्या प्रमाणावर विक्री होते. ५ ते ६ महिने वयाच्या बोकडाचे वजन १५ ते २२ किलो भरते. गांडूळ खताची निर्मिती दरवर्षी मोठ्या प्रमाणावर लेंडी खत मिळते. त्याआधारे गांडूळखत निर्मिती युनिट उभारले आहे. त्याचा वापर चारा पिकांत होतो. भाजीपाला व बागेसाठीच्या वनस्पतींसाठी होते. त्यातून अतिरिक्त उत्पन्न मिळते. मार्गदर्शन कक्ष फार्मवर वेळोवेळी कार्यशाळांचे आयोजनही करण्यात येते. फार्मशेजारी बांबू आणि शेडनेटचा वापर करून छोटेखानी मार्गदर्शन कक्ष उभारले आहेत. त्यात शेळ्यांचे आजार, उपचार याबाबत माहिती देणाऱ्या आकृत्या व छायाचित्रे लावली आहेत. परभणी येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञही मार्गदर्शनासाठी येतात. यू ट्यूब चॅनेलद्वारे प्रसार सतीश यांनी शेळीपालनातील ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी राज्यभर भ्रमंती केली आहे. सन २०१८ मध्ये शेळीपालन विषयी माहिती देणारे ‘मॉडर्न फार्मिंग- आधुनिक शेती’ हे यूट्यूब चॅनेल सुरु केले. आत्तापर्यंत दोनशेहून अधिक मार्गदर्शक व्हिडिओ ‘अपलोड’ केले आहेत. ओघवत्या शैलीतून शेळीपालनाबाबत इत्थंभूत माहिती त्याद्वारे दिली जाते. ‘चॅनेल सबस्क्रायबर्स’ ची संख्या दोन ते अडीच लाखांवर पोचल्याचे सतीश सांगतात. - सतीश रन्हेर- ८८०६२१९६४८ सुधाकर भोपाळे- ९४२२८७८४७०

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon - Agriculture News
    agrowon.esakal.com