
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नांदगाव मधलीवाडी येथील रवींद्र बोभाटे यांनी काजू प्रकिया उद्योगात प्रयोग करीत २८ हून विविध ‘फ्लेव्हर्स’ मधील काजूगर बाजारपेठेत आणले. यशस्वी ‘मार्केटिंग’ तसेच व्यवसायात टप्पाटप्याने वाढ करीत वार्षिक उलाढाल काही लाखांवर नेण्यापर्यंत मजल मारली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात नांदगाव-ओटव माईण रस्त्यालगत (ता. कणकवली) रवींद्र गोविंद बोभाटे यांचा काजू प्रकिया प्रकल्प कार्यरत आहे. याच गावातील नांदगाव मधलीवाडी येथे त्यांचे घर आहे. देवगड तालुक्याच्या नजीक असल्यामुळे या गावात हापूस आंब्याची लागवड देखील चांगल्या प्रमाणात दिसून येते. शिवाय काजूची देखील मोठ्या प्रमाणात लागवड आहे. बोभाटे यांचा संघर्ष कोकणातील अन्य गावांप्रमाणे या गावातील अनेक तरुण मुंबईत नोकरीस आहेत. बोभाटे यांनी मात्र गावातच राहून शेतीवर भर दिला. त्याला जोड म्हणून रिक्षा घेतली. दिवसभर रिक्षा चालवायची. त्यातून मिळणाऱ्या रकमेतून ते घरखर्च चालवायचे. जोडीला कुकुटपालन व्यवसाय सुरू केला. तसेच कणकवली येथील खासगी संस्थेत नोकरी पकडली. नोकरीचा कालावधी संपल्यानंतर रिक्षा चालविणे, कुटुंबाच्या मदतीने कुकुटपालन सांभाळणे असा संघर्ष सुरू होताच. तरीही आर्थिक स्थैर्य प्राप्तीसाठी व्यवसाय सुरू करावा असे वाटत होते. काजू प्रक्रियेची संधी
व्यवसायातील बाबी
आर्थिक भांडवल सन १९९६ मध्ये ४० हजार रुपये किमतीचे युनिट कर्ज काढून घेतले. सन २०१५ मध्ये पिंलींग मशिन, ड्रायर, कटिंग मशिन, टेबल आणि इमारत उभारणीसाठी १५ लाख रुपये कर्ज घेतले. इमारत बांधली. उर्वरित रक्कम खेळते भांडवल म्हणून वापरले. त्यातून काजू बी खरेदी केली. सन २०२० मध्ये पुन्हा ८ लाख रुपये कर्ज घेऊन काही अत्याधुनिक यंत्रे खरेदी केली. आज केवळ यंत्रांसाठी काही लाख रुपयांची गुंतवणूक आहे. मार्गदर्शकाच्या भूमिकेत बोभाटे काजू प्रकिया उद्योग सुरू करणाऱ्या शेतकऱ्यांना तसेच कृषी व अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करतात. आत्तापर्यंत शेकडोजणांना त्यांनी हा लाभ दिला आहे. त्यातील काही उद्योजक म्हणून कार्यरत आहेत. राज्याचे कृषी सहसंचालक सुभाष नांगरे यांनीही त्यांच्या प्रकल्पाला भेट देत उद्योजकतेचे कौतुक केले आहे. मेहनतीला काकांचे पाठबळ बोभाटे यांची प्रचंड मेहनत मुंबईत असलेले काका कै. मारुती बोभाटे यांनी पाहिली होती. ते सातत्याने पुतण्याला स्वतःचा उद्योग सुरू कर असे प्रोत्साहन देत. बोभाटे यांनी उद्योग सुरू करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी काकांनी त्यांना साडेतीन लाख रुपये मदत केली. काका ॲग्रोवनचे नियमित वाचक होते. त्यातील प्रकिया उद्योगांविषयीच्या माहितीचा उपयोग करता येईल असे ते फोनवरून वारंवार सांगायचे. दोनशेहून अधिक कात्रणे त्यांच्याकडे होती. महिनाभरापूर्वीच त्यांचे निधन झाले. कुटुंबच राबते व्यवसायात बोभाटे यांच्यासोबत पत्नी स्मिता, पत्नी, मुले निखिल व वेदांग असे सर्वजण उद्योगात राबतात. सकाळी साडेपाच वाजल्यापासून त्यांचा दिवस सुरू होतो. कामगार येण्यापूर्वीच कारखाना सुरूही झालेला असतो. व्यवसाय करताना बोभाटे यांनी कधीच लाज बाळगली नाही. कणकवली शहरात फिरून कोंबडी विक्रीही त्यांनी केली. सरासरी १५ कामगारांच्या हाताला काम दिले आहे. पैकी काही महिला आहेत. गेल्या दोन वर्षात कोरोना संकटामुळे नोकऱ्या गमावलेल्या गाव परिसरातील आठ ते दहा जणांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला. कारखान्यात कामगारांची गरज नव्हती. परंतु सामाजिक वृत्तीतून त्यांनी ही मदत केली. संपर्क- रवींद्र बोभाटे- ९६७३५३९३९९ रा.नांदगाव,मधलीवाडी,ता.कणकवली,जि- सिंधुदुर्ग,
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.