रत्नागिरी शहराजवळील भाट्ये येथे प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र कार्यरत आहे. वाणनिर्मितीपासून ते प्रक्रियेपर्यंतचे संशोधन व प्रयोग येथे सुरू असतात. महसुली उत्पन्नातही केंद्र आघाडीवर आहे. नारळासह मसाला पिके, कलमे यांच्यासह अन्य तंत्रज्ञानही शेतकऱ्यांसाठी येथे अनुभवण्यासाठी कायम उपलब्ध असते. कोकणात नारळ पिकाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. रत्नागिरी- भाट्ये येथे दापोली येथे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण विद्यापीठांतर्गत प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र कार्यरत आहे. केंद्र सरकारने एक जुलै १९५५ मध्ये सुरू केले. सन १९६८ मध्ये ते महाराष्ट्र राज्याकडे वर्ग करण्यात आले. विविध जाती, उत्पादनवाढीसह पिकाबाबत सर्वांगीण संशोधन व प्रयोग येथे कायम सुरू असतात. डॉ. वैभव शिंदे केंद्रप्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत. केंद्राचे क्षेत्र सुमारे २५. ८४ हेक्टर असून, लागवडीखालील क्षेत्र २२.५० हेक्टर आहे. त्यात चार हजार ६४५ विविध प्रकारची नारळाची झाडे आहेत. सन १९५७ पासून २७ जातींचा संग्रह येथे करण्यात आला आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प टप्पा दोन अंतर्गत मसाला पिकांच्या म्हणजे जायफळ, दालचिनी, ‘ऑलस्पाइस’ वाणांचा संग्रहही येथे पाहण्यास मिळतो. विविधांगी प्रयोगांद्वारे शिफारशीही प्रसारित केल्या आहेत. बाणवली या स्थानिक जातीपासून निवड पद्धतीने प्रताप आणि कोकण भाट्ये कोकोनट हायब्रीड १ या संकरित जाती विकसित केल्या. बाणवली, लक्षद्वीप ऑर्डिनरी, फिलिपाइन्स, फिजी, केरा संकरा आणि चंद्रसंकरा, गोदावरी गंगा या सात जाती शिफारशीत केल्या. वाणांची वैशिष्ट्ये
मसाला पिकांची लागवड केवळ नारळावरील अर्थकारण पुरेसे ठरत नाही. त्यामुळे आंतरपीक वा मिश्रपीक म्हणून मसाला पिकांच्या प्रयोगातून लाखीबाग संकल्पना विकसित केली. त्यानुसार एक एकर नारळ लागवडीत ७० नारळाची, १४० काळी मिरी, ५४ जायफळ, २४६ दालचिनी, २४६ केळी व चार हजार ३२० अननस अशी झाडे लावावीत. १० ते १२ वर्षांच्या मेहनतीतून बागायतदाराला वर्षाला नारळापासून एक लाख रुपये व उर्वरित पिकापासून अन्य उत्पन्न मिळू शकते. प्रयोगशाळा वातावरणातील बदलांचा नारळावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. विविध किडींची ओळख, उपाययोजना या अनुषंगाने केंद्रात प्रयोगशाळा कार्यरत आहे. कनिष्ठ कीटक शास्त्रज्ञ डॉ. संतोष वानखेडे येथे कार्यरत असून, मित्रकीटकांवरही येथे काम होते. काय अनुभवता येईल केंद्रात?
महसुली उत्पादनात अग्रेसर
संपर्क ः डॉ. वैभव शिंदे, ९४२२४२५७२७ वरिष्ठ शास्त्रज्ञ
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.