गृहोद्योगातून तयार केली ओळख

बुलडाणा येथील कविता अरुण गारोळे यांनी तेजस्वी पापड उद्योग या ‘ब्रँड' ने शेतीमाल प्रक्रिया, मूल्यवर्धित पदार्थांचे उत्पादन आणि विक्रीसाठी गृहउद्योग सुरु केला. विविध प्रकारचे पापड, शेवया आणि मूल्यवर्धित उत्पादनांची निर्मिती सुरू केली. यामध्ये पाच महिलांना त्यांनी रोजगार मिळवून दिला आहे.
Kavita Garole while preparing papad by modern system.
Kavita Garole while preparing papad by modern system.

बुलडाणा येथील कविता अरुण गारोळे यांनी तेजस्वी पापड उद्योग या ‘ब्रँड' ने शेतीमाल प्रक्रिया, मूल्यवर्धित पदार्थांचे उत्पादन आणि विक्रीसाठी गृहउद्योग सुरु केला. विविध प्रकारचे पापड, शेवया आणि मूल्यवर्धित उत्पादनांची निर्मिती सुरू केली. यामध्ये पाच महिलांना त्यांनी रोजगार मिळवून दिला आहे. वरोडी (ता. सिंदखेडराजा, जि. बुलडाणा) गावातील रहिवासी असलेल्या कविता यांचे लग्न २००३ मध्ये ग्रामविकास अधिकारी असलेले अरुण गारोळे यांच्यासोबत झाले. त्यानंतर २००८ मध्ये त्यांनी बुलडाणा येथे बी.एड. शिक्षणक्रमाला प्रवेश घेतला. त्यासाठी त्या बुलडाणा येथे राहण्यास आल्या. शिक्षिकेची नोकरी मिळण्यासाठी बऱ्याच ठिकाणी प्रयत्नही केला. परंतु खासगी शाळेत कमी पगारावर काम करण्यास त्यांचे मन राजी होत नव्हते. पती शासकीय नोकरीत असल्याने त्यांना स्वतःला नोकरीची गरज नव्हती. मात्र, आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी प्रक्रिया उद्योग सुरू करण्याचे त्यांनी नियोजन केले. परिसरातील बाजारपेठांचा अभ्यास केल्यानंतर पापड, शेवया निर्मिती उद्योगाची त्यांनी निवड केली. २०१२ साली प्रक्रिया उद्योग सुरु करण्यासाठी त्यांनी स्वत:चे दागिने बँकेत तारण ठेऊन कर्ज उचलले आणि तेजस्वी पापड उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली. उद्योग उभारणीसाठी तीन लाख रुपयांची गुंतवणूक केली. यातून ८० हजारांचे शेड बनवले. विद्युत पुरवठ्यासाठी वीस हजार खर्च आला. दोन लाख रुपये किमतीमध्ये पापड पीठ भिजविण्याचे यंत्र, पीठ दळण्याचे यंत्र, वीजचलीत रोलर पापड यंत्रणा खरेदी केली. व्यवसाय वृद्धीच्या दिशेने...  दिवसाला एक क्विंटल पापड तयार करण्याची क्षमता असलेल्या यंत्राच्या साहाय्याने कविताताईंचा दिवाळी ते पावसाळा सुरु होईपर्यंत पापड निर्मिती उद्योग सुरू असतो. पहिल्या वर्षी पापड निर्मिती व्यवसायात जम बसल्यानंतर व्यवसाय वाढीच्या दृष्टिकोनातून पापडासोबतच शेवया निर्मिती करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. २०११ मध्ये तासाला २५ किलो शेवया निर्मिती क्षमता असणारी यंत्रणा खरेदी केली. येथूनच व्यवसायाची घौडदौड सुरु झाली.   या दरम्यानच्या कालावधीत कविताताई आणि त्यांचे पती अरुण हे बुलडाणा कृषी विज्ञान केंद्राच्या संपर्कात आले. त्यांनी केंद्रामार्फत आयोजित कृषी माल प्रक्रिया व मूल्यवर्धित पदार्थ निर्मिती आणि सोयाबीन प्रक्रिया व मूल्यवर्धन या विषयावरील प्रशिक्षण कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेऊन प्रक्रिया तंत्रज्ञानाबाबत माहिती घेतली. मिळालेल्या ज्ञानाचा कल्पकतेने व्यवसायात उपयोग करून घेतला.सध्याच्या काळात कविताताई उडीद-सोया पापड, उडीद पापड, मूग पापड, उडीद-मूग पापड, हरभरा पापड, कतरण पापड, तांदूळ-बीट सांडई, तांदूळ -पालक सांडई , तांदूळ -टोमॅटो सांडई, तिखट तांदूळ सांडई अशा विविध चवीच्या शेवया आणि मूल्यवर्धित पदार्थाची निर्मिती करतात. त्यांच्या व्यवसायाचा कालावधी दिवाळी ते पावसाळा सुरू होइपर्यंतचा असला तरी मुख्य हंगाम हा मार्च महिन्यापासून सुरू होऊन पावसाळा सुरू होईपर्यंत म्हणजे साडेतीन ते चार महिन्यांचा राहतो. याचबरोबरीने ग्राहकांनी आणलेल्या साहित्यापासून पापड, शेवया बनविण्यासाठी मजुरी घेतली जाते. रोजगार संधी आणि आर्थिक उलाढाल कविताताईंनी पापड, शेवया तयार करण्यासाठी यंत्रामध्ये पीठ दळणे, पीठ मळणे आणि पापड, शेवया निर्मिती आणि सुकविणे तसेच इतर कामे करण्यासाठी चार महिलांना रोजगार दिला आहे. हंगामात दररोज सुमारे २०० किलो विविध प्रकारचे पापड आणि ५० किलो शेवयांचे उत्पादन होते. ग्राहकांना सेवा देण्यासोबतच तेजस्वी पापड उद्योगाव्दारे दररोज ५० किलो पापड तयार करून २२० रुपये प्रति किलो दराने विक्री केली जाते. यातून कविताताईंना ११,००० हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. दिवसाला साधारणपणे आठ ते साडे आठ हजार रुपये खर्च होतो. खर्चवजा जाता राहिलेल्या नफ्यातून कविताताई आर्थिक बचतीसह कर्ज फेड करतात. कविताताईंनी बुलडाणा येथे अडीच गुंठे जमीन खरेदी करून प्रक्रिया उद्योगासाठी नवीन शेड उभारले आहे. यासाठी पाच लाख रुपयांचा खर्च आला. २०१८-२०१९ मध्ये तेजस्वी पापड  उद्योगामार्फत १३.५० लाख रुपये किमतीचे ड्रायर सहित नवीन स्वयंचलित इलेक्ट्रिक पापड निर्मिती यंत्रणा तसेच इतर आवश्यक यंत्रणा खरेदी करण्यात आली आहे. साधारणपणे ऑक्टोबर ते फेब्रुवारी महिन्याच्या कालावधीत आठवड्याचे दोन दिवसाप्रमाणे एकूण ४० ते ४२ दिवस आणि मार्च ते पावसाळा सुरु होईपर्यंतच्या ११० दिवसांचा विचार करता वर्षभरात साधारणपणे सात लाखांची उलाढाल होते. कविताताईंनी व्यवसायाच्या सुरवातीच्या काळात जास्त प्रमाणात गुंतवणूक करणे टाळले. टप्प्याटप्प्याने व्यवसायवाढीच्या दृष्टीने प्रयत्न केले. कृषी विज्ञान केंद्राच्या तांत्रिक मार्गदर्शनानुसार नाचणी आणि इतर भरड धान्याचे पापड, खारोड्या, मूग वड्या, बिबडे निर्मिती आणि विक्री केली जाते. विविध चवीच्या शेवया (टोमॅटो, बीट, पालक, आंबा शेवया) उत्पादनाचा त्यांचा विचार आहे. कविताताईंनी सुरु केलेला गृहोद्योग आज इतरांसाठी आदर्श बनला आहे. प्रक्रिया युनिट पाहण्यासाठी आलेल्या बचत गटाच्या महिलांना कविताताई अत्यंत आत्मीयतेने मार्गदर्शन करतात.

- कविता गारोळे  ८४२११९३९८४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com