श्रावणात पुणे मार्केटला शेवंतीला येतोय भाव

श्रावण महिना सुरू झाल्याने पुण्यातीलगुलटेकडी फूल बाजारात विविध फुलांना मागणी व आवक वाढत आहे. सध्या शेवंतीला अधिक मागणी असून सरासरी २५ ते ३० रुपये प्रति किलो दराने विक्री सुरू आहे.
The arrival and demand of Shewanti and other flowers has started increasing in the flower market at Pune-Gultekdi.
The arrival and demand of Shewanti and other flowers has started increasing in the flower market at Pune-Gultekdi.

श्रावण महिना सुरू झाल्याने पुणे गुलटेकडी येथील छत्रपती शिवाजी महाराज मार्केटमधील फूल बाजारात विविध फुलांना मागणी व आवक वाढत आहे. सध्या शेवंतीला अधिक मागणी असून सरासरी २५ ते ३० रुपये प्रति किलो दराने विक्री सुरू आहे. कोरोना संकटातील दोन वर्षे फूल उत्पादकांसाठी असमाधानकारक राहिली. मात्र यंदा मार्केट बऱ्यापैकी राहून चांगला फायदा मिळण्याची शेतकऱ्यांना आशा आहे. श्रावण महिना सुरू झाला आहे. इथूनपुढच्या काळात विविध सणांना सुरवात होते. साहजिकच विविध प्रकारच्या फुलांनाही मागणी वाढू लागते. पुणे, नगर व सातारा जिल्ह्यातील काही भाग फूलशेतीसाठी प्रसिद्ध आहेत. पुणे येथील गुलटेकडी मार्केटला सध्याच्या काळात झेंडू, ॲस्टर, शेवंती, काप्री, बिजली, लिली, जुई आदी विविध फुलांची आवक सुरू आहे. शेवंती दररोज १०० ते १२० क्विंटल या प्रमाणात मार्केटमध्ये दाखल होत आहे. रविवारी (ता.. ८) १२७ क्विंटल आवक झाली. फुलांना प्रति किलो सरासरी २५ रुपये र मिळाला. त्यातून सुमारे ३ लाख २५ हजार रुपयांची उलाढाल झाली. चार ते पाच दिवस टिकवणक्षमता असल्याने शेवंती खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल अधिक असतो. येणाऱ्या सणांच्या काळात शेवंती अधिक भाव खाणार आहे. त्यामुळे दरात किलोमागे ५ ते २० रुपयांपर्यंत वाढ होण्याचा अंदाज व्यापाऱ्यांचा आहे. त्यातून शेतकऱ्यांना कोरोना संकटाच्या काळात काही प्रमाणात दिलासा मिळेल. शेवंतीला सणात मागणी शेवंतीच्या फुलांना बाराही महिने चांगले दर असतात. गणेशोत्सव, दसरा, दिवाळी या काळात ही मागणी व दरही अधिक असतात. उन्हाळ्यात लग्न कार्ये असल्यानेही शेवंतीची आवक सुरूच असते. अर्थात या काळात फुलांचे उत्पादन कमी असते. त्यामुळे दर अधिक असतात. चालू वर्षी कोरोना संकटामुळे ग्राहकांची संख्या कमी झाल्याने फुलांना उठाव कमी आहे. त्यामुळे अपेक्षित दर मिळत नाही. पर्यायाने शेतकऱ्यांना अल्प समाधान मानावे लागत आहे. पांढऱ्या फुलांची सर्वाधिक विक्री सध्या पुणे मार्केटमध्ये पांढऱ्या शेवंतीची आवक मोठ्या प्रमाणात आहे. या फुलांना पुणे शहरातील किरकोळ व्यापाऱ्यांकडून चांगली मागणी आहे. प्रति किलो १०० ते १२० या दरांप्रमाणे ते ग्राहकांना हार व सुट्या फुलांची विक्री करतात. सद्यःस्थितीत दर सर्वसाधारण असण्याची कारणे

  • मंदिरे, यात्रा, लग्नकार्ये बंद असणे
  •  वेळेचे बंधन
  • सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी
  • शेवंती- प्रकार व दर रू. (प्रति किलो)

  • पांढरी- १५ ते ३० रू. -
  • पर्पल- (गुलाबी जांभळ्या स्वरूपात) - ३० ते ५० रू.
  • पिवळी- ३० ते ६० रू.
  • गुलटेकडी शेवंती मार्केट ताजा दृष्टीक्षेप महिना...........................आवक क्विंटल उलाढाल रू. एप्रिल............................७ ४२,००० मे................................१३० ८,४५,००० जून..............................९५६ ६६,९२,००० जुलै..............................२३९० ८३,६५,००० शेवंती फूलशेती पुणे विभागात दौंडमधील यवत, नगरमधील पारनेर हे शेवंती फुलाचे हब ओळखले जातात. जवळपास ५०० ते ७०० एकरांच्या आसपास या भागातील क्षेत्र असावे. चालू वर्षी पोषक हवामान आणि चांगले दर मिळण्याची अपेक्षा असल्याने क्षेत्रात अजून वाढ झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे मार्केटमधील आवकही वाढणार आहे. शेवंतीची वाणनिहाय मार्च ते मे महिन्यात शेतकरी लागवड करतात. लागवडीपासून साधारणपणे साडेतीन ते चार महिन्यात फुले काढणीला येतात. सणांच्या मुख्य काळात फुले येत असल्याने हा हंगाम कालावधी महत्त्वाचा ठरतो. सुमारे सात ते आठ तोडे होतात. प्रतिक्रिया  गेल्या वर्षीपासून कोरोना संकटामुळे अडत्यांसह शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अनेकवेळा बाजार बंद ठेवावा लागला. आता कुठे बाजार पूर्ववत होऊ लागला आहे. सध्या तीन प्रकाराच्या फुलांची आवक होत आहे. पांढऱ्या फुलांना चांगली मागणी आहे. - सागर धनंजय भोसले, अडते, फूल बाजार, गुलटेकडी, पुणे निर्बंधामुळे फुलांची आवक कमी आहे. त्यामुळे मालाला उठाव कमी आहे. नियमांत शिथिलता आल्यानंतर मागणी वाढेल. श्रावण महिना सुरू झाल्याने फुलांना मागणी राहील. त्यातून शेतकऱ्यांना फायदा होईल. - महादेव शेवाळे, विभागप्रमुख, फूल बाजार, पुणे बाजार समिती, शेतकरी अनुभव मी शेवंतीचे अनेक वर्षापासून उत्पादन घेत आहे. यंदा अडीच एकरावर एप्रिलमध्ये लागवड केली. सहा महिन्यांनी उत्पादन सुरू होणार आहे. विक्री दरवेळेस पुणे किंवा मुंबई मार्केटमध्ये केली जाते. साधारणपणे ४० ते ५० रुपये प्रति किलो दर मिळतो. एकरी सहा ते सात टन उत्पादन मिळते. त्यातून जवळपास एकरी तीन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. ७० हजार ते एक लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. चालू वर्षी कोरोनामुळे मोठा फटका बसला आहे. त्यामुळे खर्चही निघणार नाही अशी अवस्था आहे. - भाऊसाहेब दोरगे, यवत, ता.. दौंड, जि.. पुणे ९८६०३७१६७९

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com