Agriculture Success Story: आठवडी बाजाराचा राजा झालेला एकवीस वर्षीय तरुण
Vegetable Farming: सोलापूर जिल्ह्यात बार्शी तालुक्यातील कारी येथील प्रतीक विधाते या एकवीस वर्षे वयाच्या युवा शेतकऱ्याने बारमाही विविध भाजीपाला पिकांच्या उत्पादनाचे तंत्र विकसित केलेच. परंतु व्यापारी, मध्यस्थांवर अवलंबून राहाता आठवड्यातील सातही दिवस बाजारांत थेट ग्राहकांना विक्री करण्याचे कौशल्यही अवगत केले.