Rain Forecast
Rain ForecastAgrowon

Weather Forecast : वादळी पावसाचा इशारा

Monsoon Rain : राज्याच्या बहुतांश भागात मॉन्सून दाखल झाल्यानंतर विदर्भात पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
Published on

Pune News : राज्याच्या बहुतांश भागात मॉन्सून दाखल झाल्यानंतर विदर्भात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. तर उर्वरित तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी कोसळत आहेत. आज (ता. १५) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

शुक्रवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळल्या. सकाळपासून वाढलेला उन्हाचा चटका, दुपारनंतर ढग जमा होत जोरदार वारे, विजांसह कमी काळात पडणारा जोरदार पाऊस असेच चित्र राज्याच्या विविध भागांत दिसून येत आहे.

Rain Forecast
Monsoon 2024 : पश्चिम विदर्भात अखेर मॉन्सूनचे आगमन

पावसाची उघडीप असलेल्या भागात उन्हाचा चटका आणि उकाडा कायम आहे. विदर्भात कमाल तापमान चाळीशीपार गेले असून, शुक्रवारी (ता. १४) विदर्भातील चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ४१.८ अंश तापमानाची नोंद झाली. खानदेश, पूर्व विदर्भात अद्याप मॉन्सूनची प्रतीक्षा आहे. आज (ता. १५) राज्यात वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Rain Forecast
Monsoon Rain : पुणे जिल्ह्याच्या पूर्व पट्ट्यात पावसाच्या जोरदार सरी

शुक्रवारी (ता. १४) सकाळपर्यंत २४ तासांत पडलेला पाऊस (मिमी) :

कोकण : अलिबाग १००, चिपळूण ८०, मंडणगड ७०, दापोली, तळा प्रत्येकी ६०, वैभववाडी, कुलाबा, अंबरनाथ, मुरूड, लांजा, मुलदे प्रत्येकी ५०, देवगड, कुडाळ, म्हसळा प्रत्येकी ४०, मालवण, खेड, दोडामार्ग, पालघर, कल्याण, पेण, पोलादपूर, सावंतवाडी, राजापूर, श्रीवर्धन, गुहागर प्रत्येकी ३०.

मध्य महाराष्ट्र : जळगाव, जामखेड ५०, महाबळेश्वर ४०, गगनबावडा, शाहूवाडी प्रत्येकी ३०, पाडेगाव, कवठेमहांकाळ, फलटण, पेठ, पारनेर, खंडाळा, मीरज, आटपाडी प्रत्येकी २०.

मराठवाडा : उदगीर, रेणापूर प्रत्येकी ७०, लोहारा, पाटोदा प्रत्येकी ६०, लोहा, धारूर प्रत्येकी ५०, धाराशिव ४०, देवणी, भूम, मुखेड, उदगीर प्रत्येकी ३०, सिल्लोड, शिरूर, देगलूर प्रत्येकी २०.

विदर्भ : रिसोड २०, जेवती, कोर्पणा, राजुरा, लोणार, मेहकर, बुलडाणा प्रत्येकी १०.

वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, नंदूरबार, धुळे, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सोलापूर, बीड, धाराशीव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com