Climate Change Report: ‘एल निनो’चा प्रभाव सातत्याने वाढत असल्याने ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत आणखी तीव्र होणार आहे. यामुळे जगातील बहुतांश भागांत तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता बळावली आहे. तसेच पावसाच्या पद्धतीतही मोठे बदल होण्याचा अंदाज जागतिक हवामान संघटनेने (डब्ल्यूएमओ) व्यक्त केला आहे..जागतिक हवामान संस्थेच्या मासिक अहवालानुसार, ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत ‘एल निनो’ तीव्र होऊन त्याचा प्रभाव वाढेल. जगातील प्रमुख हवामान अंदाज केंद्रांच्या विविध मॉडेल्सच्या एकत्रित अंदाजानुसार, समुद्रपृष्ठभागाच्या तापमानात सरासरीच्या तुलनेत २.९ अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. यातच हिंद महासागरातील द्विध्रुवीयता (आयओडी) सकारात्मक (पॉझिटिव्ह) होण्याचे संकेत आहेत..हे दोन्ही सागरी घटक एकत्रितपणे प्रादेशिक हवामानावर परिणाम वाढवू शकतात. विशेषतः हिंद महासागराच्या परिसरात दुष्काळ, पूर आणि वणव्याचा धोका वाढण्याची शक्यता आहे. उष्णकटिबंधीय अटलांटिक महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे..El Nino Forecast: ‘एल निनो’ अधिक तीव्र होण्याची शक्यता.संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस म्हणाले, की ही केवळ ‘एल निनो’ची सुरुवात असून, त्यामुळे उष्णता वाढवत आहे. ‘एल निनो’ची तीव्रता वाढल्यानंतर प्रचंड उष्णतेच्या लाटा, विनाशकारी वणवे आणि विक्रमी उष्ण महासागरांनी आधीच तापलेल्या पृथ्वीच्या संकटात तो आणखी भर पडणार आहे. जागतिक हवामान संस्थेच्या महासचिव सेलेस्टे साउलो म्हणाल्या, की जीवाश्म इंधने या संकटाच्या आगीत तेल ओतण्याचे काम करत आहेत. .कोळसा, तेल आणि नैसर्गिक वायूचा वाढता वापराने भविष्यातील संकट अधिक धोकादायक ठरेल. लोकांचे संरक्षण करण्यासाठी आणि या संकटाच्या मूळ कारणांवर उपाय करण्यासाठी आपण तातडीने कृती केली पाहिजे, अन्यथा संभाव्य धोके आणखी जीवघेणे ठरतील. आता तयारीचा काळ संपला आहे. मुख्य संकट येण्याची वाट पाहणे आपल्याला परवडणारे नाही..EL Nino 2026: ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान एल निनो आणखी तीव्र होण्याची शक्यता; केंद्र सरकारची राज्यसभेत माहिती.जगभरात तापमान वाढणारडल्ब्यूएमओच्या अहवालानुसार, जगातील बहुतांश भूभागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त तापमान राहण्याची अत्यंत दाट शक्यता आहे. आफ्रिका, दक्षिण युरोप, अरबी द्वीपकल्प, भारतीय उपखंड, पूर्व आशिया, मध्य अमेरिका, कॅरिबियन प्रदेश, दक्षिण आफ्रिका, दक्षिण अमेरिकेचा बहुतांश भाग आणि न्यूझीलंडमध्ये सरासरीपेक्षा जास्त तापमानाचे संकेत अधिक तीव्र आहेत. जगभरातील महासागरांमध्ये, विषुववृत्तीय प्रशांत महासागरावर तीव्र होत असलेल्या एल निनोचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येत आहे..भारतीय उपखंडात कमी पाऊसऑगस्ट ते ऑक्टोबर तीन महिन्यांच्या कालावधीत पावसाचा अंदाज तीव्र एल निनोच्या पारंपरिक हवामान स्वरूपाशी सुसंगत आहे. आफ्रिकेच्या हॉर्न प्रदेशाचा मोठा भाग, मध्य आशियातील काही भाग, दक्षिण युरोप, पश्चिम उत्तर अमेरिका, आग्नेय दक्षिण अमेरिका या भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. तर भारतीय उपखंड, दक्षिण आणि पूर्व ऑस्ट्रेलिया, दक्षिण मध्य अमेरिका, कॅरिबियन प्रदेशातील काही भाग, वायव्य दक्षिण अमेरिका, उत्तर युरोप या भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे..तापमानाचा अंदाजलाल रंग छटा : सरासरीपेक्षा जास्त करडा व पांढरा रंग : सरासरी इतकानिळ्या रंग छटा : सरासरीपेक्षा कमी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.