Monsoon Update : यंदा मॉन्सूनवर एल निनोचा प्रभाव असल्याची चर्चा सुरू असतानाच संयुक्त राष्ट्र जागतिक हवामान संस्थेने जागतिक तापमानात वाढ होण्याचा इशारा दिला आहे. पुढील पाच वर्षात जागतिक तापमानात सरासरी १.५ अंश सेल्सियसने वाढ होईल, असा धक्कादायक अहवाल नुकताच संयुक्त राष्ट्र जागतिक हवामान संघटनेने दिला आहे.
भारतीय उपखंडातील भारत, बांगलादेश, म्यानमार या देशांमध्ये यंदा उष्णतेच्या लाटांचा कहर सुरू असून हवामान बदलाचा परिणाम असल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे.
येत्या पाच वर्षात जागतिक सरासरी तापमान १.५ अंश सेल्सिअसने वाढणार आहे. त्यामुळे उष्णतेतही वाढ होईल, असा इशाराही अहवालात देण्यात आला आहे. त्यासाठी मागील ३० वर्षात सरासरी जागतिक तापमानाच्या आकडेवारीचा आधार घेण्यात आला आहे.
भारतीय शेतकऱ्यांना या तापमान वाढीची झळ सर्वाधिक बसू शकते. तापमानातील वाढ पिकांवर प्रतिकूल परिणाम करते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान वाढतं.
२०२३ ते २०२८ यांपैकी एक वर्ष सर्वाधिक उष्ण वर्ष म्हणून नोंदवले जाणार आहे. २०१६ वर्ष आतापर्यंत सर्वाधिक उष्ण वर्ष ठरलं आहे. एल निनोला अनुकूल स्थिती असल्याची चर्चा आहे. तसेच यंदाचे नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) देशात तीन ते चार दिवस उशीर दाखल होईल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.
तापमान वाढीमुळे अतिरिक्त पाऊस, बर्फ वितळण्याच्या घटना, उष्णतेची लाट आणि दुष्काळ अशा घटनांमध्ये वाढ होते. त्यामुळे पुढील पाच वर्षात तापमाना वाढ होऊन अशा घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
एल निनो प्रभाव?
जागतिक सरासरी तापमानात १.५ अंश सेल्सिअस वाढण्यास काही प्रमाणात एल निनो कारणीभूत असल्याचेही या अहवालात सांगण्यात आले आहे. विषुवृत्तीय प्रशांत महासागरात एल निनोला अनुकूल झाल्यास भारतातील मॉन्सूनवर त्याचा परिणाम होतो.
त्यामुळे देशात उष्णतेत वाढ होऊन पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता असते, असं हवामानशास्त्रज्ञ सांगतात.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.