
डॉ. रामचंद्र साबळे
या आठवड्यात महाराष्ट्रावरील हवेचे दाब वाढण्यास सुरुवात होत आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००४ हेप्टापास्कल, तर दक्षिण भागावर १००६ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. बुधवारी (ता. ९) महाराष्ट्राचे उत्तर भागावर १००६ हेप्टापास्कल व दक्षिण भागावर १००८ हेप्टापास्कल इतके हवेचे दाब होताच सूर्यप्रकाश जाणवेल. क्वचित वेळा अल्पशा पावसाची शक्यता आणि दीर्घकाळ पावसात उघडीप असेल. आठवड्याच्या सुरुवातीस आकाश ढगाळ राहील. आठवड्याच्या सुरुवातीपासूनच बंगालचे उपसागराचे उत्तरेकडील भागावर हवेचे दाब १००० हेप्टापास्कल इतके कमी राहतील. त्यातूनच अल्पशा पावसाची शक्यता आज (ता. ६) आणि उद्या (ता. ७) सर्वच जिल्ह्यांत राहील. सर्वच जिल्ह्यांत या आठवड्यात वाऱ्याचा ताशी वेग वाढेल.
या आठवड्यापासून प्रशांत महासागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान ३२ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. तसेच अरबी समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान २८ अंश सेल्सिअस इतके कमी राहील. तर बंगालचे उपसागराच्या पाण्याच्या पृष्ठभागचे तापमान २९ अंश सेल्सिअस राहील. त्यामुळे आयओडी तटस्थ राहील. मात्र ‘एल निनो’चा प्रभाव वाढण्यास सुरुवात होईल. त्यामुळेच या आठवड्यापासून पुढील काही काळ पावसात उघडीत राहणे शक्य आहे. हिंदी महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान ३० ते ३१ अंश सेल्सिअस राहील.
कोकण ः
आज (ता. ६) रत्नागिरी जिल्ह्यात ४० मि.मी., सिंधुदुर्ग जिल्ह्यात २९ मि.मी., रायगड जिल्ह्यात १७ मि.मी., ठाणे जिल्ह्यात १४ मि.मी. व पालघर जिल्ह्यात १० मि.मी. पावसाची शक्यता आहे. उद्या (ता.७) रत्नागिरी जिल्ह्यात ४३ मि.मी., सिंधुदुर्ग जिल्ह्यात २८ मि.मी., रायगड जिल्ह्यात २१ मि.मी., ठाणे जिल्ह्यात १५ मि.मी. व पालघर जिल्ह्यात ८ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत १३ कि.मी., तर रायगड व ठाणे जिल्ह्यांत १७ ते १८ कि.मी. व पालघर जिल्ह्यात २२ कि.मी. राहील. कमाल तापमान सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड व पालघर जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस, तर ठाणे जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस, तर रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८१ ते ८३ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ८४ टक्के राहील.
उत्तर महाराष्ट्र ः
आज (ता. ६) नाशिक, धुळे नंदुरबार, जळगाव जिल्ह्यांत ४ ते ७ मि.मी., तर उद्या (ता.७) २ ते ४ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून, तर ताशी वेग २२ ते २७ कि.मी. राहील. सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान २६ ते २७ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. आठवड्याच्या सुरुवातीस २ ते ४ दिवस आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७५ ते ८४ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७५ ते ८३ टक्के राहील.
मराठवाडा ः
आज (ता. ६) बीड व जालना जिल्ह्यांत ८ ते ९ मि.मी., तर धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत १ ते २ मि.मी. पावसाची शक्यता आहे. सर्वच जिल्ह्यांत उद्या (ता. ७) १ ते २ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेगात वाढ होईल. वारे ताशी १६ ते २४ कि.मी. वेगाने वाहतील. कमाल तापमान परभणी आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस, तर धाराशिव, बीड जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस राहील. कलाल तापमान लातूर व जालना जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस, तर नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, लातूर, बीड जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस, तर नांदेड, हिंगोली, जालना जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आद्रता ६२ ते ७४ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६८ ते ७५ टक्के राहील.
पश्चिम विदर्भ ः
बुलडाणा, अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत आज (ता. ६) २.५ ते ५ मिमी. तर उद्या (ता.७) ३.३ मिमी ते ७ मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून आणि ताशी वेग १२ ते १५ कि.मी. राहील. कमाल तापमान २९ ते ३० अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६६ ते ७४ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७१ ते ७७ टक्के राहील.
मध्य विदर्भ ः
यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत आज (ता. ६) ३ ते ५ मि.मी., तर उद्या (ता. ७) ५ ते १० मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग १२ ते १४ किमी राहील. सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६८ ते ७४ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७४ ते ७७ टक्के राहील.
पूर्व विदर्भ ः
चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत आज (ता. ६) ४ ते ८ मि.मी., तर उद्या (ता.७) ७ ते १० मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ११ किमी राहील. कमाल तापमान चंद्रपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७१ ते ७७ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७५ ते ८१ टक्के राहील.
पश्चिम महाराष्ट्र ः
आज (ता.६) आणि उद्या (ता.७) कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यांत २ ते ३ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा सर्वच जिल्ह्यांत नैर्ऋत्येकडून राहील. वारे ताशी २३ ते २७ किमी वेगाने वाहतील. कमाल तापमान सांगली, सातारा व नगर जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस आणि पुणे जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २१ ते २२ अंश सेल्सिअस राहील. आज (ता. ६) आणि उद्या (ता.७) आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७१ ते ८७ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७२ ते ८९ टक्के राहील.
कृषी सल्ला ः
१) सोयाबीन, कपाशी, भुईमूग, उडीद, मटकी, सूर्यफूल, चवळी, तूर, मटकी या पिकांतील मोठी तणे उपटून काढावीत व पिकांची उंची कमी असल्यास कोळपणी करावी.
२) जनावरांना व कुक्कुटपालन पक्षांना रोग प्रतिबंधक लस टोचावी.
३) जेथे रोपे दाट झाली असतील तेथे विरळणी करावी.
४) फळबागामध्ये आच्छादन करून बाष्पीभवन रोखावे.
५) पाण्याची सोय असल्यास पिकांचे गरजेनुसार पाणी द्या
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.