Maharashtra Monsoon Update: नैऋत्य मोसमी वारे अर्थात मॉन्सूनच्या आगमनाची प्रतिक्षा शेतकरी करत आहेत. परंतु मॉन्सूनचा प्रवास ठप्प असून मॉन्सून पोहचलेल्या भागातही पाऊस गायब आहे. त्यामुळे उन्हाच्या चटक्यासह उकाड्यात वाढ झाली असून काही भागात पावसाचा अंदाज आहे. कोकणात उन्हाचा चटका आणि दमट हवामानाची शक्यता असून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उन्हाचा ताप वाढणार आहे. तर विदर्भात काही जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे..आज कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात उष्ण व दमट हवामानासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक आणि सोलापूर जिल्ह्यात काही भागात उष्णतेच्या लाटेसह संध्याकाळी पावसाची शक्यता आहे. तर पुणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजा, वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम पाऊस हजेरी लावण्याची शक्यता असून सांगली, सातारा कोल्हापूर जिल्ह्यात हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे..Monsoon Update 2026 : मॉन्सूनचा प्रवास रखडलेलाच; राज्यात उन्हाचा चटक्यासह पावसाची शक्यता.तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेसह संध्याकाळी पावसाच्या सरी हजेरी हजेरी लावतील, असा अंदाज असून लातूर, धाराशिव आणि परभणी जिल्ह्यांत हलक्या सरी हजेरी लावतील अशी शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. विदर्भातील अकोला जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असून उर्वरित भागात कोरड्या हवामानाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे..Monsoon Update: माॅन्सूनने संपूर्ण केरळ व्यापत कर्नाटकपर्यंत मारली मजल.मॉन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक प्रणाली नसल्याने राज्यातील मॉन्सूनची प्रगती ठप्प आहे. सोमवारी म्हणजेच १५ जून रोजी मॉन्सूनने संपूर्ण आंध्र प्रदेशसह तेलंगणा, ओडिशा, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड राज्याच्या आणखी काही भागात प्रगती केली..त्यानंतर आज देशभरातील मॉन्सूनची वाटचाल ‘जेसै थे’ होती. मॉन्सूनची सीमा हरणई, सोलापूर, हैदराबाद, भद्राचलम, कोरापुट, फुलबनी, रांची, जमुई, मुझफ्फरपूर भागांपर्यंत होती. पुढील ४ ते ५ दिवसांत मॉन्सूनच्या पुढील प्रगतीसाठी परिस्थिती अनुकूल असून तेलंगणाच्या आणखी काही भागात, ओडिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगडच्या काही भागात मॉन्सून पुढे सरकण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.