Maharashtra Monsoon Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाच्या सरी पडत आहेत. तर मराठवाडा आणि विदर्भातसह मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी आहे. पुढील ५ दिवस राज्यातील काही जोरदार पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. .मागील काही दिवसांपासून कोकण आणि घाटमाथ्यावर काही भागात जोरदार पाऊस पडत आहे. मात्र राज्याच्या इतर भागांमध्ये पावसाचा जोर कमी आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात ढगाळ हवामानासह काही ठिकाणी हलक्या सरी पडत आहेत. बहुतांशी भागात जोरदार पावसाचा अभाव आहे. तसेच पावसाचे वितरणही असमान आहे. .Monsoon Rain Forecast: विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाज; राज्यात आजपासून तीन दिवस काही भागात पावसाची शक्यता.राज्यातील काही भागात आजपासून पुढील ४ दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. आज कोकणातील सर्वच जिल्हे तसेच नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्रातील इतर भाग तसेच विदर्भ आणि मराठवाड्यात ढगाळ हवामानासह काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे. .Rain Update: विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात वादळी पावसाचा अंदाज.उद्या कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड आणि ठाणे जिल्ह्यात तसेच पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यातील जिल्हे आणि मध्य महाराष्ट्रातील इतर भागात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. .शनिवारी विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा तसेच पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्हे आणि मराठवाड्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. .रविवारी विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, नागपूर आणि भंडारा जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात ढगाळ हवामानासह काही ठिकाणी हलक्या ते मध्य पावसाची शक्यता आहे. सोमवारी राज्यात ढगाळ हवामानासह ठिकठिकाणी हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.