Rain Update: विदर्भात पावसाचा अंदाज; उन्हाचा चटकाही कायम
IMD Weather Update: मॉन्सूनच्या परतीसाठी पोषक स्थिती असताना राज्यात ऑक्टोबर हिटचा चटका चांगलाच जाणवू लागला आहे. त्यामुळे उकाड्यात वाढ झाली आहे. आज म्हणजेच ७ ऑक्टोबर रोजी विदर्भासह काही भागात पावसाच्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.