Maharashtra Weather Update: विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेसदृश स्थिती असून, अमरावती येथे उष्णतेची लाट उसळली आहे. आज (ता. २१) अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांत तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा इशारा (रेड अलर्ट) देण्यात आला आहे. नागपूर, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांत दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे..बुधवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये उत्तर प्रदेशातील बांदा येथे देशातील उच्चांकी ४८.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पूर्व उत्तर प्रदेशात चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, त्यापासून विदर्भापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. आग्नेय अरबी समुद्रापासून केरळ, लक्षद्वीप, दक्षिण कर्नाटक, केरळ ते आंध्र प्रदेश ते मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे..बुधवारी (ता.२०) सकाळपर्यंतच्या २४ तासांत अमरावती येथे राज्यातील उच्चांकी ४६.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. वर्धा आणि अकोला येथे ४६ अंशांपेक्षा अधिक, नागपूर, यवतमाळ येथे चंद्रपूर येथे ४५ अंशांपेक्षा अधिक, परभणी, गडचिरोली येथे ४४ अंश, तर जळगाव, भंडारा, गोंदिया, वाशीम ४३ सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. यातच महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी १८.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली..Vidarbha Heatwave: विदर्भात उष्ण लाटेची शक्यता.आज (ता. २१) विदर्भातील अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांत तीव्र उष्ण लाटेची शक्यता असल्याने खबरदारीचा इशारा (रेड अलर्ट) आहे. यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यांत उष्ण लाटेची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) तर सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ हवामान, तुरळक ठिकाणी विजांसह पाऊस आणि उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे..मॉन्सून ‘जैसे थे’नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) शनिवारी (ता.१६) अंदमानात आगमन झाले. त्यानंतर सोमवारी (ता. १८) मॉन्सूनने संपूर्ण अंदमान - निकोबार बेटे, पूर्व-मध्य बंगालच्या उपसागराचा काही भाग, आग्नेय अरबी समुद्राचा आणखी काही भागसह देशाच्या दक्षिणकडील आणि श्रीलंकेच्या पश्चिमेकडे असलेल्या कोमोरिन भागात प्रगती केली आहे. बुधवारी (ता. २०) मॉन्सूनची प्रगतीची स्थिती ‘जैसे थे’ होती. तीन ते चार दिवसांत आग्नेय अरबी समुद्र, कोमोरिन भागासह बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग, संपूर्ण अंदमान समुद्रात मॉन्सून पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे..बुधवारी (ता. २०) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान. (अंश सेल्सिअसमध्ये)ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमानपुणे---३६.८---२३.९अहिल्यानगर---४०---२४.५धुळे---४२---२४.४जळगाव---४३.४---२६.८जेऊर---४१.५---२०कोल्हापूर---३०.८--२३.८महाबळेश्वर---२९.८---१८.४.मालेगाव---४२.४---२५.२नाशिक---३७.२---२२.६निफाड---३८.३---२२.७सांगली---३३.९---२३.९सातारा---३७.२---२३.९सोलापूर---४०.९---२६.९सांताक्रूझ---३३.५---२७.२डहाणू---३५.१---२६.४रत्नागिरी---३२---२५.६.Maharashtra Heatwave: विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटेचा इशारा.छत्रपती संभाजीनगर---४१.७---२७.२धाराशिव---निरंक---२७परभणी---४४.२---३०परभणी (कृषी)---४३.७---२७.४अकोला---४६---३१.८अमरावती---४६.८---२८भंडारा---४३---२९बुलडाणा---४१.६---२८.चंद्रपूर---४५.२---३१.२गडचिरोली---४४---२९.८गोंदिया---४३.८---२८.८नागपूर---४५.५---२६.८वर्धा---४६.५---३१.८वाशीम---४३.५---२६.२यवतमाळ---४५.४---३०.सरासरी तापमान (अंश से.)विभाग---किमान---कमालउत्तर महाराष्ट्र---२२.६---४३.४पश्चिम महाराष्ट्र---१८.४---४०.९मराठवाडा---२७.०---४४.२विदर्भ---२६.२---४६.८कोकण---२५.६---३५.१.उष्ण लाटेचा इशारा (रेड अलर्ट) ;अकोला, अमरावती, वर्धा.उष्ण लाटेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर.वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :सिंधुदुर्ग, कोल्हापूर.उन्हाचा चटका अधिक असलेली ठिकाणे :अमरावती ४६.८, वर्धा ४६.५, अकोला ४६, नागपूर ४५.५, यवतमाळ ४५.४, चंद्रपूर ४५.२..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.