Meteorological Department Update: राज्यात अद्यापही मॉन्सूनची प्रतीक्षा असतानाच, उन्हाचा चटका आणि उकाडा तापदायक ठरत आहे. आज (ता. १३) विदर्भात उष्णतेच्या लाटेची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. तर कोकणात उष्ण व दमट हवामानाची, तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे..शुक्रवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राजस्थानच्या जैसलमेर येथे देशातील उच्चांकी ४६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हंगामी कमी दाबाचा पट्टा पाकिस्तानातील चक्राकार वाऱ्यांपासून ते पश्चिम बंगालपर्यंत विस्तारला आहे. तमिळनाडूच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्याची स्थिती असून, त्याला लागून वाऱ्यांचे जोडक्षेत्र सक्रिय आहे..शुक्रवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये वर्धा येथे राज्यातील उच्चांकी ४४.५ अंश तापमानाची नोंद झाली. ब्रह्मपुरी आणि नागपूर येथे ४४ अंश सेल्सिअस पेक्षा अधिक, अकोला आणि यवतमाळ येथे ४३ अंशांपेक्षा अधिक तर जळगाव, मालेगाव, अमरावती, चंद्रपूर आणि वाशीम येथे ४२ अंशापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी १८.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले..India Monsoon Alert: माॅन्सून आज कुठवर पोचला ? माॅन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक हवामान आहे का ?.आज (ता. १३) विदर्भात उन्हाचा चटका वाढणार असून, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यांत उष्ण लाटेमुळे दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि विदर्भातील अकोला, अमरावती येथे उष्ण व दमट हवामान व उष्ण लाटेची शक्यता आहे. तसेच पूर्व विदर्भासह उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात ढगाळ आकाशासह उन्हाचा चटका आणि उकाडा तापदायक राहण्याची शक्यता कायम आहे..पूर्व किनाऱ्यावर मॉन्सूनची चालनैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) शुक्रवारी (ता. १२) पश्चिम बंगालसह बिहारच्या आणखी काही भागात प्रगती केली आहे. तर ओडिशा आणि झारखंडमध्येही मॉन्सूनने हजेरी लावली आहे. अरबी समुद्रावरून मॉन्सूनची स्थिती ‘जैसे थे’ असून, महाराष्ट्रातील वाटचाल मात्र अडखळली आहे. पुढील २ ते ३ दिवसांत मध्य अरबी समुद्र, महाराष्ट्राच्या काही भागांसह, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशचा उर्वरित भाग, ओडिशा, झारखंड, बिहारचा आणखी काही भाग, तसेच छत्तीसगडच्या काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे..शुक्रवारी (ता. १२) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमानपुणे---३५.९---२६.१अहिल्यानगर---निंरक---२४.७धुळे---४१.०---२४.०जळगाव---४२.५---२७.७जेऊर---३८.०---१९.०कोल्हापूर---३४.३--२४.६महाबळेश्वर---२६.१---१८.८.Maharashtra Heatwave Update: कोकण, मध्य महाराष्ट्रात उन्हाचा चटका ठरतोय तापदायक.मालेगाव---४२.२---निरंकनाशिक---३५.९---२६.२निफाड---३८.५---२६.०सांगली---३५.४---२३.९सातारा---३६.५---२४.६सोलापूर---३८.५---२६.१सांताक्रूझ---३५.३---३०.१डहाणू---३६.७---२८.७.रत्नागिरी---३४.२---२७.४छत्रपती संभाजीनगर---३९.९---२६.०धाराशिव---३६.७---२२.२परभणी---३९.९---२८.०परभणी (कृषी)---३९.८---२६.९अकोला---४३.४---२९.८अमरावती---४२.८---२८.१बुलडाणा---४१.६---२७.५.ब्रह्मपूरी---४४.२---२६.०चंद्रपूर---४२.२---२६.८गडचिरोली---४१.४---२७.६गोंदिया---४१.८---२८.०नागपूर---४४.०---२८.१वर्धा---४४.५---३१.५वाशीम---४२.४---२६.०यवतमाळ---४३.२---२५.८.सरासरी तापमान (अंश से.)विभाग---किमान---कमालउत्तर महाराष्ट्र---२४.०---४२.५पश्चिम महाराष्ट्र---१८.८---३८.५मराठवाडा---२२.२---३९.९विदर्भ---२५.८---४४.५कोकण---२७.४---३६.७.उष्ण लाटेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर.उष्ण, दमट हवामान, उष्ण लाटेचा इशारा (येलो अलर्ट) :पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, अकोला, अमरावती.वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :सिंधुदुर्ग, सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.उन्हाचा चटका कायम असलेली ठिकाणे :वर्धा ४४.५, ब्रह्मपुरी ४४.२, नागपूर ४४, अकोला ४३.४, यवतमाळ ४३.२..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.