Maharashtra Weather Update: राज्यात विजांसह वादळी पावसाची शक्यता

Monsoon 2025 Update: महाराष्ट्रात मे महिन्यात सुरू झालेला मॉन्सून जूनच्या सुरुवातीपासून कमजोर झाला आहे, मात्र राज्यातील अनेक भागांमध्ये विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्यामुळे हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे.
Monsoon
MonsoonAgrowon
Published on
Updated on

Pune News: राज्यात मे महिन्यात सुरू असलेला पावसाचा जोर जूनच्या सुरुवातीपासूनच ओसरला आहे. राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम सरी पडत असल्या तरी उन्हाचा चटका आणि उकाड्यात ही वाढ झाली आहे. आज (ता. ६) राज्यात विजांसह वादळी पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.‎

यंदा मे महिन्यातच मॉन्सूनने महाराष्ट्राच्या अनेक भागात हजेरी लावली. मे महिन्यात कोसळलेल्या पावसाने आतापर्यंतच्या उच्चांकी पर्जन्यमानाची नोंद झाली. मात्र, मॉन्सूनचे प्रवाह कमजोर होताच पावसाने उघडीप दिल्याचे स्थिती आहे. कोकणासह, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावली. यातच गुरुवारी (ता.५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ४०.२ अंश तापमानाची नोंद झाली.

Monsoon
Monsoon Update: मॉन्सून 'जैसे थे'; राज्यातील २६ जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा 

आज (ता. ६) राज्यात विजासंह पावसाची शक्यता आहे. कोकणातील ठाणे, रायगड, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर विदर्भातील छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर, बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात विजासंह वादळी पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.

गुरुवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (सौजन्य : हवामान विभाग) :

कोकण : म्हसळा ७०, तळा, अलिबाग, वैभववाडी खेड प्रत्येकी ५०, सुधागड पाली, रोहा, उरण, पेण प्रत्येकी ४०, कणकवली, वाकवली, संगमेश्वर, माणगाव, दापोली, ठाणे, राजापूर, मालवण, खालापूर, मंडणगड प्रत्येकी ३०.

मध्य महाराष्ट्र : गगनबावडा, शाहूवाडी प्रत्येकी ५०, फलटण, राधानगरी, भोर प्रत्येकी ३०, सातारा, महाबळेश्वर, कोकरूड, कागल, पाडेगाव, पुणे शहर प्रत्येकी २०.

मॉन्सून अद्यापही कमजोरच

नैॡत्य मोसमी वाऱ्यांची (मॉन्सून) चाल आठवडाभरापासून थांबली आहे. महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिशा, ते पश्चिम बंगालमध्ये दाखल झाल्यानंतर मॉन्सूनचे पुढे चाल केली नाही. अरबी समुद्रातून २६ मे पासून तर बंगालच्या उपसागरातून २९ मे पासून मॉन्सून पुढे सरकला नाही. मुंबई, अहिल्यानगर, अदिलाबाद, पूरी आणि पूर्व भारतातील बालूरघाट पर्यंतची मॉन्सूनची सीमा गुरूवारी (ता. ५) कायम होती. मॉन्सून अद्यापही कमजोर असल्याने पुढील वाटचालीस वाट पहावी लागणार आहे.

Monsoon
Maharashtra Weather: राज्यात विजांसह वादळी पावसाची शक्यता

‎गुरूवारी (ता. ५) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

‎ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

‎पुणे---२८.४---२०.९

‎‎धुळे---३६.३---२१.४

जळगाव---३६.३---२३.६

‎‎कोल्हापूर---२७.१---२०.७

‎महाबळेश्वर---१९.५---१६.१

मालेगाव---३५.०---२२.६

‎‎नाशिक---२९.१---२१.६

‎निफाड---३१.९---२१.०

‎सांगली---२८.७---२०.६

‎सातारा---२८.२---२०.८

‎सोलापूर---३४.०---२२.०

‎सांताक्रूझ---३०.०---२५.५

डहाणू---३३.६---२४.१

‎रत्नागिरी---२९.०---२२.७

‎छत्रपती संभाजीनगर---३३.४---२४.२

‎धाराशिव---३५.५---२१.२

‎परभणी---३५.३---२४.५

परभणी (कृषी)---३५.६---२३.४

‎‎अकोला---३७.९---२६.०

अमरावती---३७.२---२५.०

‎‎‎बुलडाणा---३३.६---२४.०

‎ब्रह्मपुरी---४०.२---२४.५

‎चंद्रपूर---३९.६---२६.०

‎गडचिरोली---३७.०---२३.६

‎गोंदिया---३४.८---२५.४

‎नागपूर---३९.०---२७.०

‎वर्धा---३७.५---२५.२

‎वाशीम---३६.२---निरंक

‎यवतमाळ---३६.८---२४.४

विजांसह वादळी पावसाची शक्यता (येलो अलर्ट) :

ठाणे, रायगड, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर, बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com