Weather forecast : राज्यात पहाटे गारठा आणि दुपारी उन्हाचा चटका अशी स्थिती अनुभवायला मिळत आहे. मागील दोन दिवसात किमान तापमानात काहीशी घट झाल्याने पहाटे गारठा जाणवत आहेत. तर दुपारी उन्हाचा चटका वाढू लागला आहे. राज्यातील तापमानात चढ-उतार सुरूच राहतील, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. .राज्यातील बहुतांश ठिकाणी पारा तिशीच्या पार आहे. मागील चोवीस तासात सोलापूर येथे उच्चांकी ३५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. तर राज्यात जेऊर येथे निच्चांकी ११.५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली..Winter Weather: गारठ्यात काहीशी वाढ.उत्तर भारतात थंडीचा कडाका कमी झाला आहे. देशाच्या सपाट भूभागावर पश्चिम राजस्थानमधील पाली येथे निच्चांकी ५.६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. तसेच उत्तर भारतात ढगाळ वातावरणासह पावसाच्या हलक्या सरी हजेरी लावण्यास पोषक हवामान झाले आहे..Rain Update: उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात अंशत ढगाळ वातावरण; किमान तापमानात वाढ.राज्यात सोलापूर खालोखाल रत्नागिरी येथे ३४.५ अंश, अकोला-अमरावती ३३.६ अंश, सांगली येथे ३३.६ अंश, सातारा येथे ३३.४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. .राज्यात किमान तापमानात घट होत असून कमाल तापमान स्थिर आहे. त्यामुळे पहाटे काहीसा गारठा आणि दुपारी उन्हाचा चटका, अशी स्थिती पुढील दोन ते तीन दिवस कायम राहील, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.