Rain Crop Damage : माॅन्सून यंदा उशीरा देशातून माघारी फिरणार; पीक काढणीच्या काळात पावसाने नुकसान होण्याचाही धोका

Rain Update : देशात यंदा माॅन्सूनचा मुक्काम लांबण्याची शक्यता आहे. त्यातच सप्टेंबरपासून ला निनाची स्थिती निर्माण होण्याचाही अंदाज आहे.
Maharashtra Monsoon Update
Maharashtra Monsoon UpdateAgrowon
Published on
Updated on

Pune News : देशात यंदा माॅन्सूनचा मुक्काम लांबण्याची शक्यता आहे. त्यातच सप्टेंबरपासून ला निनाची स्थिती निर्माण होण्याचाही अंदाज आहे. म्हणजेच माॅन्सूनचा परतीचा प्रवास तर लांबलेच शिवाय निनामुळे जोरदार पासाचाही अंदाज आहे, असे वृत्त राॅयटर्स या वृत्तसंस्थेने दिले. असे झाले तर ऐन पीक काढणीच्या आणि वाढीच्या काळात पावसाने पिकांचे नुकसान होण्याची भीतीही वाढली आहे.


सप्टेंबरपासून काढणीला येणाऱ्या सोयाबीन, कापूस, भात आणि कडधान्य पिकाला लांबलेल्या माॅन्सूनचा फटका बसू शकतो. हवामान विभागाच्या शास्त्रज्ञाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात कमी दाब प्रणाली निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. या प्रणालीमुळे माॅन्सूनचा परतीचा प्रवास उशीरा होऊ शकतो, असेही राॅयटर्सने म्हटले आहे. 

Maharashtra Monsoon Update
Rain Alert : राज्यात उद्यापासून पावसाचा अंदाज; मराठवाडा, विदर्भासह राज्याच्या इतर भागातही जोरदार पावसाचा अंदाज

दुसऱ्या एका शास्त्रज्ञाने सांगितले की, ला निना स्थिती सप्टेंबरपासून निर्माण होऊ शकते. त्यामुळे सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे. यापुर्वी जेव्हा माॅन्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात ला निना स्थिती तयार झाली त्यावर्षी माॅन्सूनचा परतीचा प्रवास उशीरा झाला आहे. यंदाही असेच घडू शकते, असेही या शास्त्रज्ञांनी सांगितल्याचे राॅयटर्सने आपल्या बातमीत म्हटले आहे.

माॅन्सूनचा प्रवास जून महिन्यात सुरु होतो आणि सप्टेंबरच्या मध्यानंतर माॅन्सून परतीच्या प्रवासावर निघत असतो. तर ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत माॅन्सून देशातून परतलेला असतो. आता माॅन्सूनचा प्रवास लांबण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यातच ला निनामुळे चांगल्या पावसाचाही अंदाज व्यक्त केला जात आहे. जर सप्टेंबरच्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात तसेच ऑक्टोबरच्या सुरुवातीला जोरदार पाऊस झाला तर खरिपातील काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान होऊ शकते. पण नुकसान किती होते ते पाऊस किती होतो आणि किती वेळ होतो यानुसार कमी जास्त असू शकते, असेही राॅयटर्सने म्हटले आहे. 

हवामान विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी राॅयटर्सला ही माहीती दिली. पण हवामान विभागाचा अधिकृत अंदाज अद्याप आलेला नाही. हवामान विभाग सोमवारी किंवा मंगळवारी आपला सप्टेंबर महिन्याचा अंदाज जाहीर करेल. त्यावेळी कदाचित हवामान विभाग माॅन्सूनच्या परतीच्या प्रवासाविषयीसुध्दा अंदाज देईल, अशी शक्यता आहे. 

Maharashtra Monsoon Update
Maharashtra Rain Update : मध्य महाराष्ट्र, विदर्भात हलका पाऊस

पण माॅन्सूनचा प्रवास लांबून ऐन पीक काढणीच्या काळात पिकांचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने शेतकऱ्यांची चिंताही वाढली आहे. कारण सप्टेंबरच्या शेवटी अनेक भागात सोयाबीन काढणीला आलेले असेल. लवकर लागवड झालेला कापूसही वेचणीच्या टप्प्यात असेल. या टप्प्यातील पिकांना कमी पावसाचाही फटका बसत असतो. तसेच पाऊस जास्त पडला तर पिक कोणत्याही टप्प्यात असेल तरी नुकसान होऊ शकते. 

पण माॅन्सूनचा प्रवास लांबून ऐन पीक काढणीच्या काळात पिकांचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने शेतकऱ्यांची चिंताही वाढली आहे. कारण सप्टेंबरच्या शेवटी अनेक भागात सोयाबीन काढणीला आलेले असेल. लवकर लागवड झालेला कापूसही वेचणीच्या टप्प्यात असेल. या टप्प्यातील पिकांना कमी पावसाचाही फटका बसत असतो. तसेच पाऊस जास्त पडला तर पिक कोणत्याही टप्प्यात असेल तरी नुकसान होऊ शकते. 

दरवर्षी काढणीच्या काळात पिकांचे नुकसान होते, असा अपला आजवरचा अनुभव आहे. नुकसान झाल्यानंतर आपल्याला पीकविम्याचा आधार मिळू शकतो. आपण सर्वांनी पीक विमा तर काढलाच असेल. आता पीकविम्यातून भरपाई मिळण्यासाठी ई-पीक पाहणी करून घ्या. ई-पीक पाहणी करताना तुम्हाला अडचणी असेल तर तलाठ्यांकडे तशा तक्रारी करा. कारण आपण ई-पीक पाहणी करून पिकाची नोंद केली नाही तर तलाठी करत असतात. त्यामुळे आपण ज्या पिकाचा विमा काढला त्याच पिकाची नोंद होते का? हे एकदा पाहून घ्या. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com