Weather News : उन्हाचा चटका वाढला

Summer Season : शुक्रवारपासून पावसाला पोषक हवामान
Heat Wave
Heat WaveAgrowon
Published on: 
Updated on: 

Weather Update : पुणे : राज्यात उन्हाचा चटका पुन्हा वाढू लागला आहे. मध्य महाराष्ट्रातील जेऊर आणि मालेगाव येथे राज्यातील उच्चांकी ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे. तर शुक्रवारपासून (ता. ५) राज्यात पावसाचा पोषक हवामान होत आहे.

मंगळवारी (ता. २) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मालेगाव आणि जेऊर येथे देशातील उच्चांकी ४२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तापमानात पुन्हा वाढ होऊ लागली असून, अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ४० अंशांच्या वरच आहे. आज (ता. ३) राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे. तर शुक्रवारपासून राज्याच्या विविध भागात पावसाला पोषक हवामान होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.



Heat Wave
Weather Forecast : राज्यात उन्हाचा चटका वाढला; उत्तर भारतात पावसाचा इशारा

मंगळ (ता. २) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :
पुणे ३९.६, नगर ३९.०, धुळे ४०.५, जेऊर ४२.०, कोल्हापूर ३८.५, महाबळेश्वर ३२.९, मालेगाव ४२.०, नाशिक ३७.८, निफाड ३७.७, सांगली ३९.३, सातारा ३९.०, सोलापूर ४१.५, सांताक्रूझ ३४.२, डहाणू ३४.३, रत्नागिरी ३३.४, छत्रपती संभाजीनगर ३८.८, बीड ४०.२, परभणी ४०.०, अकोला ४०.९, अमरावती ४०.४, बुलडाणा ३७.६, ब्रह्मपुरी ४१.०, चंद्रपूर ४०.२, गडचिरोली ४०.०, गोंदिया ३९.५, नागपूर ४०.६, वर्धा ४०.९, वाशीम ४१.४, यवतमाळ ४०.५.

उन्हाच्या झळा असह्य
पूर्व विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक, दक्षिण तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. राज्यात दिवसा उन्हाच्या झळा असह्य होत असतानाच रात्री देखील उष्ण ठरत आहेत. दिवसभर असलेला उकाडा रात्रीच्या वेळी कायम राहत आहे. दुपारच्या वेळी उन्हाचा चटका चांगलाच तापदायक ठरत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com