Pune News: राज्यात पहाटे गारठा जाणवत आहे. तर दुपारी उन्हाच्या चटक्यासह उकाडा वाढला आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा तिशीच्या पार असून काही भागात अंशत ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे. आज राज्यात किमान तापमानात चढ-उतार सुरुच राहणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे..मागील चोवीस तासात कोकणात उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे. रत्नागिरीत उच्चांकी ३५.६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली..Maharashtra Weather: पहाटे गारठा तर दुपारी उकाडा.तर सांताक्रुज येथे ३५.२ अंश, अलिबाग येथे ३४ अंश, तर सोलापूर येथे ३३.१ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. तर उर्वरित राज्यात कमाल तापमान तिशीच्या पार होतं. तर राज्यात जेऊर येथे निच्चांकी ११ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली..Weather Update : कोकणात उन्हाचा चटका; उकाड्यात वाढ.उत्तर भारतात थंडीच्या लाटा कमी-जास्त होत आहेत. तसेच काही भागात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे गारठा कमी झाला आहे. मागील चोवीस तासात देशातील सपाट भूभागातील सिकार आणि अंबिकापूर येथे निच्चांकी ६.३ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली..कोमोरीन क्षेत्र आणि परिसरात वरच्या हवेतील चक्राकार वारे आता मन्नारच्या आखातावर असून समुद्रसपाटीपासून सरासरी १.५ किमी उंचीवर पसरलेले आहेत. पुढील पाच दिवस राज्यात कमाल तापमान स्थिर राहील. तर उत्तर कोकणातील किमान तापमानात पुढील २ दिवसात स्थिर राहून त्यानंतर ३ ते ४ अंशाने तापमानात घट होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.