Weather News
Temperature UpdateAgrowon

Maharashtra Weather Update : तापमानात चढ-उताराची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

Weather News : उन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ झाली आहे. आज (ता. २) कमाल आणि किमान तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
Published on

Pune News : उत्तरेकडील शीत लहरींचा अभाव, सातत्याने होणारे ढगाळ हवामान राज्यात थंडी कमी असली, तरी कमाल आणि किमान तापमान कमी-अधिक होत आहे. उन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ झाली आहे. आज (ता. २) कमाल आणि किमान तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

पूर्व राजस्थानात समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. वायव्य भारतात १२.६ किलोमीटर उंचीपर्यंत १३० नॉट्स वेगाने पश्‍चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे प्रवाह कायम आहेत. शनिवारी (ता. १) राजस्थानमधील गंगानगर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ६.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

Weather News
IMD Cold Weather Prediction : फेब्रुवारी महिन्यात थंडी कमीच राहणार

राज्यात धुके आणि दव पडल्याचे चित्र कायम आहे. शनिवारी (ता. १) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी ९.६ अंश सेल्सिअस, तर निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ९.८ अंश तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमान १० ते २० अंशांच्या दरम्यान आहे.

Weather News
Maharashtra Weather Update : ढगाळ हवामानासह किमान तापमानात वाढ शक्य

उन्हाचा चटका कायम असल्याने कमाल तापमान ३२ ते ३६ अंशांदरम्यान स्थिरावले असून, उकाड्यामुळे घामटा निघत आहे. शनिवारी (ता. १) सकाळपर्यंतच्या २४ तासांत सोलापूर येथे ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. जेऊर, अकोला आणि वाशीम येथे पारा ३५ अंशांपार आहे. आज (ता. २) किमान तापमानातील चढ-उतार कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

शनिवारी (ता. १) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

पुणे---३४.८---१३.८

अहिल्यानगर---३४.१---१३.४

धुळे---३२.५---९.६

जळगाव---३२.३---१४

जेऊर---३५---१४.५

कोल्हापूर---३३.६---१८.८

महाबळेश्‍वर---२८.८---१५.५

मालेगाव---३३.४---१४.४

नाशिक---३२.१---१२.३

निफाड---३०.४---९.८

सांगली---३३.९---१७.७

सातारा---३४.३---१५.७

सोलापूर---३६---१८.४

सांताक्रूझ---३१.८---१७.९

डहाणू---२९.६---१६.७

रत्नागिरी---३१.५---१८.१

छत्रपती संभाजीनगर---३३---१६.५

धाराशिव---३२.८---१४.१

परभणी---३४.५---१६.८

परभणी (कृषी)---३४---१३

अकोला---३५.३---१७.४

अमरावती---३४.४---१५.९

भंडारा---३२.२---१७

बुलडाणा---३३.४---१९.४

ब्रह्मपुरी---३४.३---१८

चंद्रपूर---३४---निरंक

गडचिरोली---३२.८---१७

गोंदिया---३१.८---२०.४

नागपूर---३४---१८.१

वर्धा---३४.५---१७.८

वाशीम---३५.४---१९.८

यवतमाळ---३४.८---१९.८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com