Pune News: राज्यात किमान तापमानात वाढ झाली असून थंडी गायब झाली आहे. कमाल तापमानाचा पारा तिशीच्या पार गेला आहे. त्यामुळे उकाड्यात वाढ झाली आहे. आज राज्यात कोरड्या हवामानासह उन्हाचा चटका काय राहण्याची शक्यता आहेत.तर राज्याच्या किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे..राज्यात मागील चोवीस तासात सांताक्रूझ येथे उच्चांकी ३५.१ अंश तापमानाची नोंद झाली. तर उर्वरित राज्यातही तापमानाचा पारा तिशीच्या पार आहे. कोकणात उन्हाचा चटका अधिक आहे. मुंबईतील कोलाबा येथे ३३.८ अंश, हरनाई ३३.१ अंश, तर रत्नागिरी येथे ३३.६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली..Weather Update: कोकणात उन्हाचा चटका वाढला.तर अहिल्यानगर, संभाजीनगर, बीड, जळगाव, कोल्हापूर, नाशिक, परभणी, धाराशिव, सोलापूर येथे कमाल तापमानाचा पारा तिशीपार होता. तर राज्यातील जेऊर येथे निच्चांकी १२.० अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. .Winter Weather: थंडी गायब, उकाडा वाढला.आग्नेय अरबी समुद्र आणि लगतच्या लक्षद्वीप क्षेत्र आणि केरल किनाऱ्यावर वरच्या हेवेचे चक्राकर अभिसरण आता लक्षद्वीप आणि परिसरात असून ते समुद्रसपाटीपासून सरासरी १.५ किमी अंतरावर पसरलेले आहे. तर कोमोरीन क्षेत्र आणि परिसरात सरासरी समुद्रसपाटीपासून १.५ किमी वर एक वरच्या हवेचे चक्राकार अभिसरण आहे..राज्यातील पुढील चार ते पाच दिवस कमाल तापमानात मोठा होण्याची शक्यता नाही. तर किमान तापमानात पुढील १ ते २ अंश सेल्सियसने हळूहळू घट होऊ त्यानंतर २४ तासात वाढ आणि पुन्हा २ ते ३ अंशाने घट होण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.