Temperature Rise
Temperature RiseAgrowon

Maharashtra Weather Update: राज्यात अनेक ठिकाणी सकाळी गारवा वाढला; सोलापुरात तापमानाचा पारा पोचला ३७ अंशांच्या पार 

Heatwave Alert: राज्यात अनेक भागात सकाळी गारव्याची छाया असली तरी सोलापुरात उन्हाळ्याची तीव्रता वाढत आहे. येथील तापमान ३७ अंश सेल्सिअसपर्यंत पोचले आहे.
Published on

Pune News: राज्यात सध्या सकाळी थंडी आणि दुपारी उन्हाचा चटका असे वातावरण दिसत आहे. सकाळी अनेक ठिकाणी किमान तापमान काही ठिकाणी १० ते १२ अंशाच्या दरम्यान राहत आहे.

तर दुपारचे तापमान काही ठिकाणी ३६ अंशांवर पोचले. यामुळे तापमानातील तफावत वाढलेले दिसते. आज निफाड येथील गहू संशोधन केंद्रात सर्वात कमी ७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर सोलापूर येथे सर्वाधिक ३७.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. 

Temperature Rise
Maharashtra Weather Update : कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार शक्य; राज्यात उन्हाळ्याची चाहूल

उत्तर भारतातही तापमानातील चढ उतार सुरु आहेत. उत्तर भारतात अनेक ठिकाणी तापमाना सध्या १० अंशांच्याही खाली आहे.

Temperature Rise
Weather Changes: तापमानातील तफावत वाढली: पहाटे गारठा, दुपारी उकाडा!

आज पंजाबमधील आदमपूर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उत्तर भारतात १२.६ किलोमीटर उंचीपर्यंत १३० नॉट्स वेगाने पश्‍चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे प्रवाह कायम आहेत. त्याचा परिणाम थंडीवर दिसून येत आहे. 

राज्यातील तापमानातील चढ उतार आहेत. मागील दोन दिवसांपासून सकाळीच्या वेळेत गारवा काहीसा वाढला. राज्यातील अनेक भागात किमान तापमानात घट झाली आहे. तर दुपारी उन्हाचा चटकाही जाणवत आहे. राज्यातील अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ३५ अंशांच्या पुढे गेला आहे. राज्यातील तापमानात चढ उतार कायम राहतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com