
Pune News: मॉन्सूनचे आगमन होताच कोकणासह राज्यात दमदार पाऊस पडत आहे. आज (ता. २७) रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यासह आणि सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधारेची शक्यता असल्याने सावधानतेचा इशारा (रेड अलर्ट) आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार पावसाचा अंदाज असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
मराठवाडा आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. त्यापासून तेलंगण, छत्तीसगड ते आंध्रप्रदेशपर्यंत हवेचा कमा दाबाचा पट्टा सक्रिय आहे. बंगालच्या उपसागरात आज (ता. २७) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. सोमवारी (ता. २६) सकाळपर्यंत रत्नागिरी, रायगड आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस झाला आहे. सोमवारी दिवसभर मुंबईसह कोकणात पावसाचा जोर कायम होता. मध्य महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळला. सोमवारी सकाळपर्यंत रायगड जिल्ह्यातील मुरूड येथे उच्चांकी ३७० मिलिमीटर पाऊस पडला. श्रीवर्धन, म्हसळासह रत्नागिरीतील हर्णे येथे ३०० मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली.
आज (ता. २७) रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यांसह सातारा घाटमाथा घाटमाथ्यावर मुसळधारेची शक्यता असल्याने सावधगिरीचा इशारा (रेड अलर्ट) देण्यात आला आहे. रायगड, पुणे जिल्ह्यांचा घाटमाथा, सातारा, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. ठाणे, मुंबई, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, गडचिरोली जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा असल्याने, तसेच उर्वरित राज्यात वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
सोमवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात पडलेला पाऊस, मिलीमीटरमध्ये (सौजन्य : हवामान विभाग) :
कोकण : मुरूड ३७०, हर्णे ३१०, म्हसळा ३०, मंडणगड २१, तळा, माथेरान १८०, रोहा १७०, अलिबाग १५०, कुलाबा, वाकवली प्रत्येकी १३०, गुहागर, दापोली १२०, रत्नागिरी, चिपळूण ११०, सुधागड-पाली, संगमेश्वर, महाड, लांजा प्रत्येकी १००, पोलादरपूर ९०, खेड, पनवेल, रामेश्वर ८०, कुडाळ, मलदे, वैभववाडी, दोडामार्ग प्रत्येकी ७०, माणगाव, खालापूर, मुरबाड प्रत्येकी ६०, उरण, कर्जत, पेण, रायगड, सावंतवाडी, प्रत्येकी ५०.
मध्य महाराष्ट्र : लोणावळा २४०, सिन्नर १५०, कर्जत, चास प्रत्येकी १००, फलटण, महाबळेश्वर, शाहूवाडी प्रत्येकी ९०, राहुरी, गगनबावडा प्रत्येकी ८०, जुन्नर ७०, घोडेगाव, पाडेगाव प्रत्येकी ६०, इंदापूर, पाथर्डी, बारामती, शिरूर घोडनदी, राधानगरी, वेल्हे, शेवगाव, खटाव, गडहिंग्लज, चंदगड, खंडाळा, प्रत्येकी ५०, दौंड, कोकरूड, कोल्हापूर, कागल, संगमनेर, खेड, राजगुरुनगर, पौड, जत, वडगाव मावळ, सासवड प्रत्येकी ४०, तेळगाव, शिराळा, अहिल्यानगर, कोपरगाव, सातारा, हातकणंगले, श्रीगोंदा, संख प्रत्येकी ३०.
मराठवाडा : आष्टी, उमरगा ३०, मंथा, धारूर, अंबड, पातूर प्रत्येकी २०.
विदर्भ : वाशीम ५०, वर्धा ४०, बुलडाणा ३०, धानोरा, अकोला, सावोली प्रत्येकी २०.
सोमवारी (ता. २६) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान
पुणे---२८.०---२१.३
अहिल्यानगर---२५.०---२१.७
धुळे---३४.०---२२.४
जळगाव---३४.८---२५.०
जेऊर---२६.०---२०.०
कोल्हापूर---२५.६---२०.६
महाबळेश्वर---२०.५---१७.३
मालेगाव---३५.४---२२.४
नाशिक---३१.३---२४.१
निफाड---३२.६---२३.३
सांगली---२५.२---२०.४
सातारा---२५.७---२१.४
सोलापूर---२८.३---२४.२
सांताक्रूझ---३४.७---२४.४
डहाणू---३२.१---२७.७
रत्नागिरी---२६.६---२२.७
छत्रपती संभाजीनगर---२९.२---२३.७
धाराशिव---२७.२---२१.०
परभणी---३१.७---२४.९
परभणी (कृषी)---३१.०---२४.४
अकोला---३२.४---२५.४
अमरावती---२७.८---२५.३
बुलडाणा---३५.०---२५.०
ब्रह्मपुरी---३७.०---२६.१
चंद्रपूर---३७.२---२५.०
गडचिरोली---३४.०---२४.०
गोंदिया---३५.२---२५.०
नागपूर---३६.०---२६.४
वर्धा---३४.५---२४.२
वाशीम---३०.८---निरंक
यवतमाळ---३०.०---२४.०
मुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) :
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा घाटमाथा.
जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :
रायगड, पुणे घाटमाथा, सातारा, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड.
जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
ठाणे, मुंबई, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, गडचिरोली.
विजांसह पावसाची शक्यता (येलो अलर्ट) :
नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर.
२०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झालेली ठिकाणे :
मुरूड ३७०, श्रीवर्धन ३१०, म्हसळा ३०० (जि. रायगड), हर्णे ३१० मंडणगड (जि. रत्नागिरी), लोणावळा २४० (जि. पुणे).
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.