Maharashtra Rain Forecast: राज्यात विजांसह पावसाचा अंदाज

Weather Update: कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळत असल्या तरी मराठवाडा आणि विदर्भात मात्र पावसाची उघडीप आहे. विदर्भात उन्हाचा चटका वाढल्याने तापमान चाळिशीपार पोचले आहे.
Rain Forecast
Rain ForecastAgrowon
Published on
Updated on

Pune News : कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळत असल्या तरी मराठवाडा आणि विदर्भात मात्र पावसाची उघडीप आहे. विदर्भात उन्हाचा चटका वाढल्याने तापमान चाळिशीपार पोचले आहे. आज (ता. ८) राज्यात विजांसह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

‎मध्य प्रदेश आणि परिसरावर समद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. तसेच विदर्भापासून उत्तर कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. विदर्भात कमाल तापमान वाढल्याने पारा चाळीशीपार गेला आहे. शनिवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ४२.४ अंश तापमानाची नोंद झाली. ‎‎नागपूर, चंद्रपूर, ‎वर्धा, ‎यवतमाळ येथे पारा चाळिशीपार होता.

Rain Forecast
Monsoon Rain Alert: राज्यात पावसाचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काही ठिकाणी येलो अलर्ट

आज (ता. ८) राज्यात विजासंह पावसाची अंदाज कायम आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, पुणे, सातारा, सोलापूर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, वाशीम, यवतमाळ, गडचिरोली जिल्ह्यात विजासंह वादळी पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.

शनिवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात पडलेला पाऊस, मिलीमीटरमध्ये (सौजन्य : हवामान विभाग) :

कोकण : मोखाडा, पोलादपूर प्रत्येकी ५०, सांताक्रुझ ४०, रत्नागिरी ३०, माणगाव, माथेरान प्रत्येकी २०, चिपळूण, शहापूर, कुलाबा, ठाणे प्रत्येकी १०.

मध्य महाराष्ट्र : सातारा, वाई प्रत्येकी ४०, पिंपळगाव बसवंत, पाडेगाव, राजगुरुनगर प्रत्येकी ३०, दिंडोरी, देवळा, नाशिक, पलूस प्रत्येकी २०, पुणे शहर, पेठ, बारामती, पाटण, इंदापूर, तासगाव, घोडेगाव, संगमनेर, चास प्रत्येकी १०.

मराठवाडा : धाराशिव, उमरगा, रेणापूर प्रत्येकी १०.

मॉन्सून जैसे थे

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) यंदा वेगाने प्रगती करत मे महिन्यात महाराष्ट्रात धडक दिली. महाराष्ट्रातील मुंबईसह अहिल्यानगर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या काही भागांत २६ मेपर्यंत मजल मारली. बंगालच्या उपसागरातून देखील २९ मेपर्यंत मॉन्सूनची चाल सुरू होती, त्यानंतर मात्र मॉन्सूनचे प्रवाह मंदावल्याने शनिवारी (ता. ७) मॉन्सूनची वाटचालीची सीमा जैसे थे होती.

Rain Forecast
Monsoon Rain: विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा येलो अलर्ट

शनिवारी (ता. ७) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

‎ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

‎पुणे---३३.०---२२.८

‎‎धुळे---३८.६---२३.६

जेऊर---३५.५---२०.०

‎‎कोल्हापूर---३१.६---२३.१

‎महाबळेश्वर---२४.५---१८.०

मालेगाव---३७.२---२२.४

‎‎नाशिक---३२.१---२१.०

‎निफाड---३५.२---२०.९

‎सांगली---निरंक---२२.७

‎सातारा---३०.५---२१.४

‎सोलापूर---३६.०---२४.६

‎सांताक्रूझ---३१.७---२५.५

डहाणू---३३.४---२६.०

‎रत्नागिरी---३१.२---२३.९

‎छत्रपती संभाजीनगर---३४.३---२४.२

‎धाराशिव---३४.४---निरंक

‎परभणी---३६.९---२५.३

परभणी (कृषी)---३६.५---२४.९

‎‎अकोला---३८.८---२८.८

अमरावती---३९.८---२६.३

बुलडाणा---निरंक---२५.०

‎ब्रह्मपुरी---४२.४---२६.०

‎चंद्रपूर---४१.६---२६.६

‎गडचिरोली---३९.२---२५.६

‎गोंदिया---३९.९---२६.४

‎नागपूर---४१.८---२८.५

‎वर्धा---४१.५---२८.०

‎वाशीम---३९.०---२६.०

‎यवतमाळ---४०.४---२७.४

रविवारी (ता. ८) राज्यातील पावसाचा अंदाज दर्शविणारा नकाशा (स्रोत : हवामान विभाग) :

विजांसह वादळी पावसाची शक्यता (येलो अलर्ट) :

रायगड, रत्नागिरी, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, वाशीम, यवतमाळ, गडचिरोली.

४० अंशांपेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे :

‎ब्रह्मपुरी ४२.४, ‎‎नागपूर ४१.८, चंद्रपूर ४१.६, ‎वर्धा ४१.५, ‎यवतमाळ ४०.४.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com