
Pune News : राज्यातील थंडीचा कडाका कमी झाला आहे. तर अनेक भागात ढगाळ वातावरण होते. हवामान विभागाने पुढील ४ दिवस काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. तसेच बुलडाणा, अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीटीची शक्यता असून अनेक ठिकाणी ढगाळ वातारण राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला.
हवामान विभागाने उद्या नाशिक, धुळे, जळगाव, नंदूरबार आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा येलो अलर्ट आहे. तसेच पुणे, नगर, बीड आणि जालना जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.
शुक्रवारी बुलडाणा, अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीट होऊ शकते. तर या चारही जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी ढगाळ वातावरण आणि काही भागात हलक्या पावसाच्या सरींचीही शक्यता आहे, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.
तसेच शुक्रवारी पुणे, नगर, नाशिक, जळगाव, नंदूरबार, धुळे, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली, यवतमाळ आणि नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. तर कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी शुक्रवारी विजांसह हलक्या पावसाचाही अंदाजही हवामान विभागाने दिला.
शनिवारी नगर, बीड, जालना, जळगाव, अमरावती, नागपूर आणि भंडारा जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलस्या पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. तर पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नाशिक, धुळे, परभणी, लातूर, धाराशिव, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातही काही भागांमध्ये विजांसह हलक्या पावसाचा शनिवारी अंदाज असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
रविवारी राज्यातील पावसाळी वातावरण कमी होईल. रविवारी पुणे, नगर, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.