Maharashtra IMD Alert : मराठवाडा, विदर्भात पावसाची शक्यता; कोणत्या जिल्ह्यांमध्ये पडणार पाऊस?

Maharashtra Weather Update : हवामान विभागाने आज मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात ठिकठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला. तर बीड जिल्ह्यातही काही ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता व्यक्त केली.
Heavy Rain
Heavy RainAgrowon
Published on
Updated on

Maharashtra Monsoon News : पुणेः हवामान विभागाने आज मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा येलो अलर्ट (yellow alert) दिला. पण बहुतांशी भागात आजही पाऊस (Rain) पडला नाही. राज्यातील अनेक भागांमधील पीकं आता हातची जाण्याची वेळ आली. पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. त्यातच काही जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने पुढील काही दिवस (weather report) पावसाचा अंदाज दिला.

हवामान विभागाने आज मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अंदाज दिला. हवामान विभागाने आज मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात ठिकठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला. तर बीड (Beed) जिल्ह्यातही काही ठिकाणी विजांसह पावसाची (Rain with lightning) शक्यता व्यक्त केली.

विदर्भातील अमरावती, वर्धा, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदीया जिल्ह्यातही हवामान विभागाने पावसाचा अंदाज दिला. या जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी  विजांसह जोरदार पावसाची शक्यता आहे. यासोबतच राज्याच्या इतर भागांमध्ये काही ठिकाणी हलक्या सरी होतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.

उद्या विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर परवा म्हणजेच गुरुवारी विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com