Maharashtra Weather Forecast: कोकण, घाटमाथ्यासह राज्यात कोसळणाऱ्या पावसाचा जोर कमी होण्याची चिन्हे आहेत. आज (ता. ८) पुणे घाटमाथा, सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर अति जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे..हंगामी कमी दाबाचा पट्टा मंगळवारी (ता. ७) कमी दाबाचे केंद्र नैर्ऋत्य राजस्थानपासून ते बांगलादेशपर्यंत विस्तारला होता. दक्षिण गुजरात आणि केरळच्या किनाऱ्यालगत किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा कायम आहे. आग्नेय अरबी समुद्रापासून गुजरात, कमी दाबाचे केंद्र ते बांगलादेशपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे..मंगळवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नागपूर, वाशीम, जळगाव येथे राज्यातील उच्चांकी ३२.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी १८.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम होता. सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये अनेक ठिकाणी ३०० मिलिमीटर पेक्षा अधिक पाऊस झाला. घाटमाथ्यावरील दावडी येथे यंदाच्या हंगामातील राज्यातील उच्चांकी ६८८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुणे आणि रायगड जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावरील लोणवळा, ताम्हिणी, भिरा येथे ५०० मिमी पेक्षा अधिक पाऊसमान झाले. उर्वरित राज्यात हलक्या ते जोरदार पावसाच्या सरी पडल्या..Rain Andaj : कोकणासह घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम; मध्य महाराष्ट्र, विदर्भातही पावसाचा अंदाज.आज (ता. ८) पुणे घाटमाथा आणि सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर अति जोरदार सरींची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. पालघर, रायगड, रत्नागिरी तसेच कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा, तर विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे..मॉन्सून लवकरच देश व्यापणारनैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) मंगळवारी (ता. ७) संपूर्ण गुजरातसह, अरबी समुद्र आणि राजस्थानच्या आणखी काही भागात प्रगती केली आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत मॉन्सून अरबी समुद्र, राजस्थान, हरियाना, पंजाबच्या उर्वरित भागासह संपूर्ण देश व्यापण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे..कमी दाब क्षेत्र ओसरतयबंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र (डिप्रेशन) जमिनीवर आल्यानंतर त्याची तीव्रता कमी झाली आहे. मंगळवारी (ता. ७) ही प्रणाली पूर्व मध्य प्रदेश आणि परिसरावर होती. आज (ता. ८) ही प्रणाली उत्तर प्रदेशकडे सरकून जाताना निवळण्याची शक्यता आहे..मंगळवारी (ता. ७) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमानपुणे---२४.७---२२.७अहिल्यानगर---२५---२३.४धुळे---३३---२०जळगाव---३३.६---२५.४जेऊर---३०.५---१९कोल्हापूर---२६.१--२२.७महाबळेश्वर---२०---१८.४मालेगाव---निरंक---२२.२.Maharashtra Heavy Rainfall: कोकण, घाटमाथ्यावर मुसळधार शक्य.नाशिक---२६.५---२२.६निफाड---२९.०---२३सांगली---२७.९---२३सातारा---२५---२२.६सोलापूर---३१.९---२४.४सांताक्रूझ---२७.३---२६.४डहाणू---२७.५---२३.४रत्नागिरी---३०.५---२५.५.छत्रपती संभाजीनगर---२७.३---२३धाराशिव---२७.५---१९परभणी---३१.५---२४.५परभणी (कृषी)---२९.८---२३.८अकोला---३२.९---२५.७अमरावती---३२.४---२३.३भंडारा---३१---२२बुलडाणा---३०.२---२३.६.ब्रह्मपूरी---३०.८---२४चंद्रपूर---३३.४---२६.२गडचिरोली---२९.६---२५.२गोंदिया---२७.९---२३.६नागपूर---३३.६---२३.२वर्धा---३३.६---२५.४वाशीम---२९.६---२१.६यवतमाळ---३१.६---१५.६.सरासरी तापमान (अंश से.)विभाग---किमान---कमालउत्तर महाराष्ट्र---२०---३३.६पश्चिम महाराष्ट्र---१८.४---३१.९मराठवाडा---१९---३१.५विदर्भ---१५.६---३३.६कोकण---२३.४---३०.५.अति जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा.जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :पालघर, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर घाटमाथा.विजांसह वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.