Rain Forecast : राज्यात आज पुन्हा विजांसह पावसाचा अंदाज

राज्याच्या गेल्या काही दिवसांपासून विजा, मेघगर्जनेसह वादळी पावसाने हजेरी लावली आहे.
Rain Forecast
Rain ForecastAgowon

Weather Update पुणे : राज्याच्या गेल्या काही दिवसांपासून विजा, मेघगर्जनेसह वादळी पावसाने (Heavy Rainfall) हजेरी लावली आहे. काही ठिकाणी जोरदार गारपिटीनेही (Hailstorm) तडाखा दिला आहे.

आज (ता. १९) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज (Rain Forecast) आहे. तर तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशाराही हवामान विभागाने (Weather Department) दिला आहे.

पावसाची हजेरी ढगाळ वातावरण यामुळे राज्यातील कमाल तापमानात चढ-उतार होत आहेत. शनिवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये वर्धा येथे राज्यतील उच्चांकी ३४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

उर्वरित राज्यात कमाल तापमान पुन्हा ३० अंशांच्या वर गेले आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३० ते ३५ अंशांच्या दरम्यान होते.

Rain Forecast
Cloudy Weather : ढगाळ हवामानामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर

दक्षिण कर्नाटकपासून झारखंड पर्यंत समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

राजस्थानपासून उत्तर प्रदेश समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर पूर्व-पश्चिम कमी दाबाचा पट्टा, तसेच ईशान्य अरबी समुद्रापासून राजस्थानपर्यंत समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीपर्यंत हवेचा कूमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

राजस्थान आणि उत्तर गुजरातमध्ये चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. या पोषक हवामान स्थितीमुळे राज्यात पाऊस सुरू आहे. आज (ता. १९) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाच्या काही भागात जोरदार वारे, विजा आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

Rain Forecast
Rain Update News : ‘अवकाळी’च्या सततच्या संकटाने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला

शनिवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३१.४ (१५.८), जळगाव ३३.३ (१८.६), धुळे ३०.० (१६.०), कोल्हापूर ३२.६ (२१.२), महाबळेश्वर २५.४ (१४.४), नाशिक ३०.३ (१५.६), निफाड ३१.६(१४.५), सांगली ३१.६ (१९.४), सातारा ३१.० (१८.९), सोलापूर ३३.०(२०.०), सांताक्रूझ ३३.४ (२३.१),

डहाणू ३२.२ (२१.६), रत्नागिरी ३३.४ (२३.१), छत्रपती संभाजीनगर ३१.३ (१३.३), नांदेड ३१.२ (२०.०), परभणी ३२.०(१९.०), अकोला ३२.९ (१८.२), अमरावती २८.६(१६.५),

बुलढाणा ३१.२ (१७.०), ब्रह्मपूरी ३४.८ (२१.०), चंद्रपूर ३१.६ (२०.८), गडचिरोली ३२.४(१८.६), गोंदिया ३३.० (१७.२), नागपूर ३३.० (१९.०), वर्धा ३३.९(१९.९), वाशीम ३१.६ (१७.६), यवतमाळ ३३.१ (१७.५).

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

मध्य महाराष्ट्र : नाशिक, नगर.

मराठवाडा : हिंगोली, नांदेड, लातूर.

विदर्भ : अकोला, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com