Weather Update : पूर्व मोसमी पावसाचा राज्यात आजपासून अंदाज

Rain Forecast : पुढील काही दिवसांत मोसमी वारे महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता असल्याने जोरदार पावसासह मॉन्सूनच्या आगमनाचे वेध लागले आहेत.
Weekly Weather Update
Weekly Weather Update Agrowon

Pune News : आजपासून (ता. ३) राज्यात पूर्व मोसमी पावसाचा अंदाज आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिण भागातील जिल्ह्यांसह, पूर्व विदर्भात वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

दरम्यान, अरबी समुद्रातून मॉन्सूनची वाटचाल सुरू झाली आहे. पुढील काही दिवसांत मोसमी वारे महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता असल्याने जोरदार पावसासह मॉन्सूनच्या आगमनाचे वेध लागले आहेत. यातच

Weekly Weather Update
Weekly Weather Update : अल्पशा पावसाची शक्यता

उन्हाचा चटका कायम असल्याने विदर्भ होरपळत आहे. तर उर्वरित राज्यातही उन्हाचा चटका असह्य होत असून, उकाडा त्रासदायक ठरत आहे. विदर्भात उन्हाची लाट कायम असल्याने ब्रह्मपुरी येथे उच्चांकी ४६.५ अंश तापमानाची नोंद झाली. विदर्भात बहुतांश ठिकाणी तापमान ४४ अंशांच्या पुढे आहे. आज (ता. ३) उत्तर कोकणात उष्ण व दमट हवामानाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहणार आहे.

राज्याच्या दक्षिणेकडील भागात सापेक्ष आर्द्रता वाढत असून, पश्चिमेकडील वाऱ्यांचे प्रवाह बळकट होत आहेत. यावरून मॉन्सूनच्या आगमनास पोषक हवामान होत आहे. आजपासून (ता. ३) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिण भागातील जिल्ह्यांमध्ये, तसेच पूर्व विदर्भात वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाचा इशारा (यलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

Weekly Weather Update
Weather Update: राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा कायम

रविवारी (ता. २) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३७.२, धुळे ४२.०, जळगाव ४०.९, कोल्हापूर ३४.२, महाबळेश्वर २८.७, मालेगाव ४२.६, नाशिक ३६.५, निफाड ३७.५, सांगली ३६.४, सातारा ३५.९, सोलापूर ४०.२, सांताक्रूझ ३५.५, रत्नागिरी ३४.९,

छत्रपती संभाजीनगर ४०.०, नांदेड ४०.२, परभणी ४२.२, अकोला ४३.५, अमरावती ४४.६, भंडारा ४४.४, बुलडाणा ३८.८, ब्रह्मपुरी ४६.५, चंद्रपूर ४५.०, गडचिरोली ४४.०, गोंदिया ४४.९, नागपूर ४५.४, वर्धा ४६.०, वाशीम ४२.६, यवतमाळ ४४.५.

उष्ण, दमट हवामानाचा इशारा (येलो अलर्ट) :

पालघर, ठाणे.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

सिंधुदुर्ग, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया.

४४ अंशांपेक्षा अधिक तापमानाची ठिकाणे

ब्रह्मपुरी ४६.५, वर्धा ४६, नागपूर ४५.४, चंद्रपूर ४५, गोंदिया ४४.९, अमरावती ४४.६, यवतमाळ ४४.५, भंडारा ४४.४, गडचिरोली ४४.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com