Rain Forecast
Rain Forecast Agrowon

Rain Forecast : राज्यात विजांसह पावसाची शक्यता

Weather Update : राज्यात पावसाला पोषक हवामानामुळे ढगाळ आकाश झाल्याने थंडी ओसरली आहे.
Published on

Pune News : राज्यात पावसाला पोषक हवामानामुळे ढगाळ आकाश झाल्याने थंडी ओसरली आहे. आज (ता. ७) राज्यात ढगाळ आकाशासह तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज कायम आहे. तर किमान तापमानात चढ-उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

उत्तर भारतात थंडीची लाट आल्याने, शनिवारी (ता. ६) राजस्थानमधील सिकार येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी २ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. पंजाब, हरियाना, चंडीगड, राजस्थान, उत्तर प्रदेशमध्ये तीव्र थंडीच्या लाटेबरोबरच दाट धुके ही स्थिती कायम आहे. उत्तर भारतात तीव्र थंडीची लाट टिकून राहण्याची शक्यता आहे.

राज्यातील थंडी ओसरली असली तरी उत्तर महाराष्ट्राच्या किमान तापमानात वाढ झाली आहे. शनिवारी (ता. ६) निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी १०.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

उत्तर महाराष्ट्र वगळता उर्वरित राज्याच्या बहुतांश भागात किमान तापमान १४ ते २० अंशांच्या दरम्यान आहे. आज (ता. ७) राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता आहे.

Rain Forecast
Weather Update : राज्यात पावसाला पोषक हवामान

लक्षद्वीप बेटांजवळ चक्राकार वाऱ्याची स्थिती कायम आहे. त्यापासून दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. दक्षिण गुजरातपासून उत्तर प्रदेशातील चक्राकार वाऱ्यांपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे.

यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान असल्याने आज (ता. ७) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे.

Rain Forecast
Weather Update : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची शक्यता

शनिवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे २९.८ (१४.६), धुळे २७.० (११.२), जळगाव २९.० (१७.०), कोल्हापूर २९.१ (१९.९), महाबळेश्वर २६.१ (१५.३), नाशिक २९.५ (१२.८), निफाड २९.० (१०.८), सांगली २९.७ (१९.७), सातारा २८.६ (१७.५), सोलापूर ३१.९(१७.७), सांताक्रूझ ३०.६ (१७.५), डहाणू २६.४ (१६.५), रत्नागिरी ३१.८ (१९.७),

छत्रपती संभाजीनगर २७.२ (१६.९), नांदेड २८.८ (१८.८), परभणी २९.८ (१७.१), अकोला २९.८ (१९.०), अमरावती २९.० (१७.९), बुलडाणा २६.६ (१६.४), ब्रह्मपुरी २९.६ (१६.९), चंद्रपूर २८.० (१५.४), गडचिरोली २९.२ (१४.६), गोंदिया २७.५ (१६.६), नागपूर २८.४(१८.९), वर्धा २९.२(१९.५), वाशीम - (१६.६), यवतमाळ ३०.२ (-).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com