Maharashtra Weather Update: ‘अक्वान’ चक्रीवादळ निवळल्यानंतर राज्यात तयार झालेल्या ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात वाढ झाली. राज्यात थंडी कमी झाली असून, दुपारच्या वेळी उकाडा वाढला आहे. आज (ता. २५) राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे..उत्तर महाराष्ट्र आणि कोकण परिसरावर समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. राज्यात ढगाळ हवामान झाल्याने किमान तापमानात घट झाली आहे. तर उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला आहे. मंगळवारी (ता. २४) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी १२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. उर्वरित राज्याच्या किमान तापमान १५ अंशांच्या वर गेले आहे..किमान तापमानासह कमाल तापमानात देखील वाढ होत असून, मंगळवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी ३५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात बहुतांशी ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३० अंशांच्या वरच आहे. आज (ता. २५) राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे..Maharashtra Weather Update: राज्यात तापमानात वाढ, थंडी झाली कमी.मंगळवारी (ता. २४) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमानपुणे---३१.१---१६.२अहिल्यानगर---निरंक---१९.३धुळे---३१.०---१२.०जळगाव---३२.२---१७.०जेऊर---३२.०---१५.५कोल्हापूर---३०.५---१८.०महाबळेश्वर---२६.२---१५.५नाशिक---३१.०---१६.७.निफाड---३१.५---१६.३सांगली---३२.२---१७.९सातारा---३२.३---१६.४सोलापूर---३४.१---१९.९सांताक्रूझ---३४.५---२२.६डहाणू---३२.७---२१.८रत्नागिरी---३५.०---२१.१.Weekly Weather: पूर्व विदर्भात पावसाची शक्यता.छत्रपती संभाजीनगर---३१.२---१७.०धाराशिव---३०.८---१७.९परभणी---३२.३---१९.२परभणी (कृषी)---३१.१---१७.५अकोला---३२.५---१८.०अमरावती---३३.८---१८.५ब्रह्मपूरी---२९.०---१८.८.बुलडाणा---३०.४---१७.७चंद्रपूर---३०.०---१७.७गडचिरोली---३०.४---१८.६गोंदिया---२९.२---१६.६नागपूर---३१.०---१६.२वर्धा---३२.०---१७.४वाशीम---३१.२---१८.२यवतमाळ---३१.६---१६.६.सरासरी तापमान (अंश से.)विभाग---किमान---कमालउत्तर महाराष्ट्र---१२.०---३२.२पश्चिम महाराष्ट्र---१५.५---३४.१कोकण---१७.०---३५.०मराठवाडा---१६.०---३२.३विदर्भ---१६.३---३३.८.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.