Parbhani Rain Update : परभणी जिल्ह्यात जूनमध्ये पावसाचा नीचांक

Rain News : जून महिन्यात अपेक्षित सरासरी व प्रत्यक्षातील पाऊस यामध्ये परभणी जिल्ह्यात ८९.८ मिलिमीटर व हिंगोली जिल्ह्यात १२४.१ मिलिमीटर एवढी तूट आली आहे.
Rain Forecast
Rain ForecastAgrowon
Published on
Updated on

Parbhani Monsoon Rain News : जून महिन्यात परभणी जिल्ह्यात सरासरी १४५.३० मिलिमीटर पाऊस अपेक्षित आहे. परंतु यंदा (२०२३) प्रत्यक्षात ५५.५ मिलिमीटर (३८.३ टक्के), तर हिंगोली जिल्ह्यात सरासरी १६९.२० मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात सरासरी ४५.२ मिलिमीटर (२६.७ टक्के) पाऊस झाल.

जून महिन्यात अपेक्षित सरासरी व प्रत्यक्षातील पाऊस यामध्ये परभणी जिल्ह्यात ८९.८ मिलिमीटर व हिंगोली जिल्ह्यात १२४.१ मिलिमीटर एवढी तूट आली आहे. या दोन जिल्ह्यांमध्ये जून महिन्यातील पावसाचा यंदाचा नीचांक आहे.

परभणी जिल्ह्यात जून महिन्यातील पावसाची तुलना केली असता २०१२ ते २०२३ या १२ वर्षांच्या कालखंडात ७ वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला, तर पाच वर्षांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. यंदाच्या जून महिन्यात सर्वाधिक गंगाखेड मंडळामध्ये १३०.७ मिमी (१०८.२ टक्के) पाऊस झाला.

सर्वांत कमी झरी (ता. परभणी) मंडळामध्ये २३ मिमी (१४.७ टक्के) पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील ५१ मंडलांत सरासरीच्या तुलनेत १४.७ ते ९७ टक्के पाऊस झाला. गंगाखेड, महातपुरी, माखणी या ३ मंडलांत १०० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. जिल्ह्यात २०१४ मधील जून महिन्यानंतर यंदाच्या जून महिन्यात नीचांकी पाऊस झाला आहे.

Rain Forecast
Parbhani Rain News : पेरणीसाठी शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतिक्षा

हिंगोली जिल्ह्यात १२४.१ मिलिमीटर तूट..

हिंगोली जिल्ह्याची जून महिन्याची पावसाची सरासरी १६९.२० मिमी आहे. परंतु यंदा प्रत्यक्षात ४५.२ मिमी (२६.७ टक्के) पाऊस झाला. सरासरीच्या तुलनेत १२४.१ मिलिमीटर तूट आहे. यंदा जिल्ह्यातील सर्व ३० मंडलांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे.

सर्वांत कमी पाऊस बासंबा (ता. हिंगोली) मंडलामध्ये १६.७ मिमी (९.७ टक्के), तर सर्वाधिक पाऊस डोंगरकडा (ता. कळमनुरी) मंडलामध्ये ८२.६ मिमी (४८.१ टक्के) झाला आहे. जून महिन्यात गतवर्षी (२०२२ मध्ये १२१.७ मिमी (७१.९ टक्के), तर २०२१ मध्ये २५०.७ मिमी (१४८.२ टक्के) व २०२० मध्ये २३५ मिमी (१३९ टक्के) पाऊस झाला. जूनची सरासरी १६८.५ मिमी असताना २०१९ मध्ये ६७.५४ मिमी (४० टक्के), २०१८ मध्ये २४२.४ मिमी (१५४ टक्के) पाऊस झाला होता.

२०१९ नंतर यंदा पावसाचा नीचांक आहे

परभणी जिल्हा जून महिन्यातील तुलनात्मक पाऊस स्थिती (मिलिमीटरमध्ये)

वर्षे - सरासरी- प्रत्यक्ष पाऊस- टक्केवारी

२०१२ -१२६.६ - ९९.४५- ७८.५

२०१३ - १२६.६- १३४.५- १०६.२

२०१४ -१२६.६ -३५.६४ - २८.१

२०१५ - १२६.६- ७७.८९- ६१.५

२०१६ - १२६.६- ११९.६९- ९४.५

२०१७ - १२६.६- १३१.१- १०३.५

Rain Forecast
Monsoon Update : पावसाच्या आगमनामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित

२०१८- १२६.६ - १९७.३ - १५५.८

२०१९ - १२६.६ -८२.७ - ६५.१

२०२० - १४५.३ - १९६.८- १३५.४

२०२१ - १४५.३- २५०.५ - १७२.४

२०२२- १४५.३ -१३७.४- ९४.६

२०२३- १४५.३ - ५५.५ - ३८.२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com