IMD Weather Warning: विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेसदृश स्थिती असतानाच, कोकण, मध्य महाराष्ट्रात पूर्वमोसमी वादळी पावसाला पोषक हवामान आहे. आज (ता. १९) यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांत तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. मराठवाडा, विदर्भात उष्णतेची लाट येण्याची, तर दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात जिल्ह्यांत वादळी पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे..सोमवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये उत्तर प्रदेशातील बांदा येथे देशातील उच्चांकी ४६.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पश्चिम मध्य प्रदेश ते मध्य महाराष्ट्र, मराठवाडा ते उत्तर कर्नाटकपर्यंत समुद्र सपाटापासून १.५ किलोमीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा आहे. यातच आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर समुद्र सपाटीपासून ३.१ ते ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून त्यापासून रायलसीमा, दक्षिण कर्नाटक, केरळ ते आग्नेय अरबी समुद्र ते लक्षद्वीप बेटांपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे..सोमवारी (ता.१८) सकाळपर्यंतच्या २४ तासांत अकोला आणि वर्धा येथे राज्यातील उच्चांकी ४६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अमरावती आणि परभणी येथे ४५ अंशांपेक्षा अधिक, सोलापूर, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, यवतमाळ येथे ४४ अंशांपेक्षा अधिक, तर जळगाव, गडचिरोली, वाशीम येथे ४३ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. यातच महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी २०.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली..Monsoon 2026: यंदा मॉन्सून दगा देणार?; 'एल निनो'मुळे खरीप पीक उत्पादन घटणार, 'आयसीएआर'च्या अभ्यासातून चिंता व्यक्त .आज (ता. १९) विदर्भातील यवतमाळ, वर्धा जिल्ह्यांत तीव्र उष्ण लाटेची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. मराठवाड्यातील परभणी, हिंगोली विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर जिल्ह्यात उष्ण लाटेची, तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ हवामान, तुरळक ठिकाणी विजांसह पाऊस आणि उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे..सोमवारी (ता. १८) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान. (अंश सेल्सिअसमध्ये)ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमानपुणे---३९.२---२४अहिल्यानगर---४१.१---२५.३जळगाव---४३.९---२७.८जेऊर---४२---२१.५कोल्हापूर---३८.५--२५.५महाबळेश्वर---३२.३---२०.२मालेगाव---४२.२---२४.८.नाशिक---३९---२४.२निफाड---४०.९---२४सांगली---४२---२५.८सातारा---४०.२---२५.१सोलापूर---४४.०---२९.६सांताक्रूझ---३४.३---२७.४डहाणू---३५.३---२५.८रत्नागिरी---३३.९---२८.Maharashtra Summer Heat: उन्हाच्या चटक्यात वाढ.छत्रपती संभाजीनगर---४२.४---२९.३धाराशिव---४१.९---२५.७परभणी---४५.२---२८.४परभणी (कृषी)---४३.२---२४.६अकोला---४६---२९.८अमरावती---४५.८---२७.९भंडारा---४२---२६बुलडाणा---४२.२---२९.८ब्रह्मपुरी---४४.६---२८.९.चंद्रपूर---४४---३१गडचिरोली---४३---२९.४गोंदिया---४४.२---२७.२नागपूर---४४.४---२९वर्धा---४६---३२.५वाशीम---४३---२६.६यवतमाळ---४४.४---३१.६.सरासरी तापमान (अंश से.)विभाग---किमान---कमालउत्तर महाराष्ट्र---२४---४३.९पश्चिम महाराष्ट्र---२०.२---४४.४मराठवाडा---२४.६---४५.२विदर्भ---२६---४६कोकण---२५.८---३५.३.उष्ण लाटेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) : यवतमाळ, वर्धा.उष्ण लाटेचा इशारा (येलो अलर्ट) : परभणी, हिंगोली, अकोला, अमरावती, नागपूर.वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर.उन्हाचा चटका अधिक असलेली ठिकाणे : अकोला ४६, वर्धा ४६, अमरावती ४५.८, परभणी ४५.२..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.