Maharashtra Weather Update: मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी पावसाला सुरुवात झाली असून, तुरळक ठिकाणी गारपिटीने तडाखा दिला आहे. आज (ता. ३१) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी पाऊस आणि गारपिटीचा अंदाज असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. उर्वरित राज्यात वादळी पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) कायम असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे..विदर्भापासून मराठवाडा, कर्नाटक ते दक्षिण तमिळनाडूपर्यंत वाऱ्यांचे प्रवाह खंडित झाल्याने हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. सोमवारी (ता. ३०) सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांमध्ये महाराष्ट्रातील अकोला येथे देशातील उच्चांकी ४१.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर पंजाबच्या गुरुदासपूर येथे नीचांकी १५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली..राज्यात सकाळपासूनच उन्हाच्या झळा वाढत आहे. रात्री उशिरापर्यंत उकाडा टिकून राहत असल्याने घामाच्या धारा वाहत आहेत. सोमवारी (ता. ३०) अकोलासह अमरावती आणि वर्धा येथे ४१ अंशापेक्षा अधिक, ब्रह्मपुरी, नागपूर, चंद्रपूर, वाशीम, मालेगाव, भंडारा आणि गडचिरोली येथे ४० अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात येथे राज्यातील नीचांकी १७.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले..Hailstorm Prediction : दोन दिवस गारपीटीचा अंदाज; राज्यात पुढील ५ दिवस पावसाला पोषक वातावरण.आज (ता. ३१) मध्य महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात विजांसह वादळी पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे..सोमवारी (ता. ३०) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमानपुणे---३६.६---२१.७अहिल्यानगर---३८.०---१७.३धुळे---३८.०---१७.५जळगाव---निंरक---२३.८जेऊर---३७.५---२२.०कोल्हापूर---३६.२--२३.१महाबळेश्वर---३०.१---१९.२मालेगाव---४०.०---२०.६.नाशिक---३५.०---१९.१निफाड---३५.६---१७.४सांगली---३६.९---२३.५सातारा---३७.७---२२.९सोलापूर---३९.२---२५.४सांताक्रूझ---३२.४---२४.५डहाणू---३२.६---२३.१रत्नागिरी---३३.०---२५.१छत्रपती संभाजीनगर---३७.६---२३.८.Maharashtra Weather: मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात गारपिटीचा इशारा.धाराशिव---३७.६---२०.१परभणी---३९.४---२३.५परभणी (कृषी)---३८.५---१९.५अकोला---४१.४---२५.३अमरावती---४१.२---२२.३भंडारा---४०.०---२३.०बुलडाणा---३८.०---२४.२ब्रह्मपुरी---४०.९---२२.१.चंद्रपूर---४०.२---२५.०गडचिरोली---४०.०---२१.६गोंदिया---३९.४---२२.२नागपूर---४०.६---२२.६वर्धा---४१.०---२५.०वाशीम---४०.२---१९.०यवतमाळ---३९.८---२६.५.सरासरी तापमान (अंश से.)विभाग---किमान---कमालउत्तर महाराष्ट्र---१७.४---४०.०पश्चिम महाराष्ट्र---१९.२---३९.२मराठवाडा---१९.५---३९.४विदर्भ---१९.०---४१.४कोकण---२३.१---३३.०.वादळी पाऊस गारपिटीचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली.विजांसह वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदूरबार, धुळे, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर, धाराशिव, लातूर नांदेड, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर.उन्हाचा चटका अधिक असलेली ठिकाणे :अकोला ४१.४, अमरावती ४१.२, वर्धा ४१, ब्रह्मपुरी ४०.९, नागपूर ४०.६, चंद्रपूर ४०.२, वाशीम ४०.२, मालेगाव ४०, भंडारा ४०, गडचिरोली ४०..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.