Paus Andaj : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट

Monsoon Update : माॅन्सूनने राज्य व्यापल्यानंतर अनेक भागात पावसाच्या सरी होत आहेत. कोकणात पावसाचा जोर अधिक आहे. तसेच अनेक भागात पावसासाठी पोषक हवामान आहे.
Rain News
Rain News Agrowon
Published on: 
Updated on: 

Rain News : माॅन्सूनने राज्य व्यापल्यानंतर अनेक भागात पावसाच्या सरी होत आहेत. कोकणात पावसाचा जोर अधिक आहे. तसेच अनेक भागात पावसासाठी पोषक हवामान आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील तीन दिवस राज्यात ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

तर उद्या कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला.

हवामान विभागाने पुढील पाच दिवस राज्यात ठिकठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त केला. उद्या म्हणजेच २७ जून रोजी, मंगळवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात ठिकठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला.

पुणे, सातारा, नाशिक, रत्नागिरी, रायगड, मुंबई आणि ठाणे तसेच विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदीया या जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला. तर विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. 

दक्षिण मध्य महाराष्ट्र, पश्चिम विदर्भात जोरदार पावसाचा इशारा, असून, उर्वरित राज्यात हलक्या ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

तसेच बुधवारी म्हणजेच २८ जून रोज काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे. बुधवारसाठी पुणे, रायगड आणि मुंबई जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला. तर सातारा, रत्नागिरी, नाशिक, ठाणे, अकोला, अमरावती, वर्धा आणि  नागपूर जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाचा येलो अलर्ट जारी केला. गुरुवारी, २९ जून रोजी रत्नागिरी, रायगड, पुणे आणि मुंबईमध्ये काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी होण्याची शक्यता आहे.

Rain News
Monsoon 2023: माॅन्सून एक्सप्रेस आज कुठपर्यंत पोचली?

मॉन्सून दाखल झाल्यानंतर राज्यात सर्वदूर पावसाच्या सरी कोसळत आहेत. कोकणात पावसाचा जोर कायम असून, उर्वरित राज्यातही हलक्या ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रायगड जिल्ह्यातील रोहा येथे सर्वाधिक १५० मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.