Monsoon News Pune : अरबी समुद्रातून अनेक दिवस रेंगाळलेल्या मॉन्सूनची वाटचाल सुरू झाली आहे. शनिवारी (ता. २४) कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मॉन्सूनचे दणक्यात आगमन झाले आहे. पूर्व विदर्भात मॉन्सूनने प्रगती केली असून, अलिबाग, सोलापूर, उदगीर आणि नागपूरपर्यंत मॉन्सूनने धाव घेतली आहे.
बंगालच्या उपसागरावरील शाखा बळकट झाल्याने पूर्व भारतात मॉन्सूनची घोडदौड सुरू होती. शुक्रवारी (ता. २३) पूर्व विदर्भाच्या काही भागात मॉन्सूनने प्रगती केली. पूर्व आणि दक्षिणेकडील राज्यातही मॉन्सूनची मोठी प्रगती झाली.
दरम्यान केरळमध्ये ८ जून रोजी डेरेदाखल झाल्यांनतर ११ जून रोजी मॉन्सूनने कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात हजेरी लावली. 'बिपॉरजॉय' चक्रीवादळामुळे तब्बल १३ दिवस पुढील वाटचाल थांबली होती. शनिवारी (ता. २४) अरबी समुद्रावरून मॉन्सूनने पुढे चाल केली.
शनिवारी (ता. २४) संपूर्ण, कर्नाटक, तेंलंगणा आणि छत्तीसगड, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागासह, विदर्भाचा आणखी काही भाग, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा, जम्मू काश्मिर आणि लडाखच्या काही भागात मॉन्सूनने धडक दिली आहे.
मॉन्सूनच्या वाटचालीची सीमा अलिबाग, सोलापूर, उदगीर, नागपूर, मंदळा, सोनभद्र, बक्सर, सिध्दार्थनगर, पंतनगर, बिजनोर, यमुनानगर, उना आणि द्रास पर्यंत असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
पुढील वाटचालीस पोषक हवामान असल्याने मुंबईसह महाराष्ट्राच्या आणखी काही भाग, गुजरातचा काही भाग, बिहार, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाखसह, हरियाणा, चंडीगड, दिल्ली, पूर्व राजस्थान, पंजाबच्या काही भागात सोमवारपर्यंत (ता. २६) मॉन्सूनची प्रगती होण्याची शक्यता आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.