Maharashtra Weather Update: केरळच्या उंबरठ्यावर पोहचलेला मॉन्सून पुढील २४ तासात केरळमध्ये दाखल होण्यासाठी पोषक स्थिती असल्याचे हवामानशास्त्र विभागाने जाहीर केले आहे. राज्यात मॉन्सून पूर्व पावसासाठी पोषक स्थिती निर्माण झाली असून आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात विजा आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे..मागील चार दिवसांपासून मॉन्सूनची स्थिती 'जैसे थे' आहे. आता मात्र पुढील २४ तासांत मॉन्सून पुढील वाटचालीसाठी हवामान पोषक आहे. मॉन्सून नैऋत्य आणि आग्नेय अरबी समुद्राच्या आणखी काही भागांत, लक्षद्वीप बेटांमध्ये, केरळ आणि तामिळनाडूच्या काही भागांत, तसेच नैऋत्य, पश्चिम-मध्य, पूर्व-मध्य आणि ईशान्य बंगालच्या उपसागरातील आणखी काही भागांत तसेच आग्नेय बंगालच्या उपसागराच्या उर्वरित भागांत पुढे सरकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे..Maharashtra Weather Update: मॉन्सूनपूर्व सरींची शक्यता.कोकणात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असून मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर पालघर आणि ठाणे जिल्ह्यांत उष्ण व दमट हवामानासह दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे..मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह मेघगर्जना होण्याचा अंदाज आहे. नाशिकच्या घाट परिसरातही विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी पडण्याची शक्यता असून काही ठिकाणी वाऱ्यांचा वेग वाढू शकतो. तर पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून काही ठिकाणी वादळी वारे वाहू शकतात. तसेच घाटमाथा परिसरात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे..तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. काही ठिकाणी वादळी वारे वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे..Monsoon Update: माॅन्सून ४ जूनपर्यंत केरळात येणार; राज्यभारत पुढील ५ दिवस वादळी पावसासाठी पोषक हवामान.विदर्भातील अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूरसह अनेक जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे..तर उद्या राज्यातील बहुतांश भागात पावसाचे वातावरण कायम राहणार आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह मेघगर्जनेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.