IMD Weather Update: नैॡत्य मोसमी वाऱ्यांचे (मॉन्सून) प्रवाह वाढल्याने देशातील वाटचालीत वेग पकडला आहे. अरबी समुद्रावरून प्रवास सुरू होताच बुधवारी (ता. २४) अवघ्या तीन दिवसांत मोसमी वाऱ्यांना संपूर्ण महाराष्ट्र कवेत घेतला आहे. राज्यात सर्वदूर कमी-अधिक पावसाने हजेरी लावली असून, आता जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. .यंदाच्या मॉन्सून हंगामावर ‘एल निनो’चे सावट आहे. यातच केरळमध्ये उशिराने दाखल झालेल्या मॉन्सूनने संपूर्ण महाराष्ट्रातील आगमनाला उशीर केला. परिणामी, शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या होत्या. अरबी समुद्रावरून जवळपास पंधरा दिवस थबकलेल्या नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी चांगलाच वेग धरत बुधवारी (ता. २४) संपूर्ण महाराष्ट्र आधिपत्याखाली घेतला आहे..Monsoon Rain: मॉन्सूनची घोडदौड सुरुच; कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा इशारा.यंदा ६ जून रोजी मॉन्सून एक्स्प्रेस महाराष्ट्रात दाखल झाली. ८ जून रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णै आणि मध्य महाराष्ट्रातील सोलापूरपर्यंत मॉन्सूनने मजल मारली. त्यानंतर मात्र अरबी समुद्रावरून मॉन्सूनची चाल थांबली होती. तब्बल दोन आठवड्यानंतर सोमवारी (ता. २२) पुढे चाल करत मॉन्सूनने कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात प्रगती केली होती..Maharashtra Monsoon: मॉन्सूनची आगेकूच.दुसऱ्याच दिवशी मंगळवारी (ता. २३) मॉन्सूनने जवळपास कोकण आणि मराठवाडा व्यापला. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही मॉन्सूनने प्रगती केली..बुधवारी (ता. २४)तिसऱ्या दिवशी उत्तर महाराष्ट्र, उत्तर विदर्भाचा राहिलेला भागात दाखल होत मोसमी वारे संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचले आहे. मॉन्सूनने गुजरात, मध्य प्रदेशाचा काही भाग व्यापला असून, छत्तीसगड आणि झारखंडच्या आणखी काही भागात वाटचाल केली आहे. मॉन्सूनच्या पुढील वाटचालीस पोषक स्थिती असल्याने पुढील दोन ते तीन दिवसांत अरबी समुद्र, गुजरात, मध्य प्रदेशचा आणखी काही भाग, छत्तीसगड, झारखंड, बिहारचा उर्वरित भाग, तसेच उत्तर प्रदेशच्या काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.