Maharashtra Weather Update: नैऋत्य मोसमी वारे अर्थात मॉन्सूनने तब्बल दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर पुढील प्रवास सुरु केला आहे. मॉन्सूनने सोमवारी म्हणजेच आज मध्य अरबी समुद्रातील आणखी काही भाग, महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटकचा उर्वरित भाग तसेच छत्तीसगड, ओडिशा, झारखंड आणि बिहारमधील काही भागांमध्ये प्रगती केली असून मॉन्सूनची सीमा आज अलिबाग, पुणे, निजामाबाद, दंतेवाडा, बलांगीर, सुंदरगड, चतरा, गया आणि मुझफ्फरपूर या भागांत आहे. .पुढील ४८ तासांत मॉन्सून मध्य अरबी समुद्राच्या उर्वरित भागात, मुंबईसह महाराष्ट्रातील आणखी काही भागांत, तेलंगणाच्या उर्वरित भागात, ओडिशा तसेच छत्तीसगड, झारखंड आणि बिहारच्या आणखी काही भागांत मॉन्सून पुढे सरकण्यासाठी पोषक स्थिती असल्याचे हवामानशास्त्र विभागाने जाहीर केले आहे..Monsoon Update : खुशखबर! मॉन्सूनने पुण्यापर्यंत मजल मारली; दोन आठवड्यांनंतर मॉन्सूनची आगेकूच.राज्यातील शेतकरी मॉन्सूनच्या सरींची प्रतिक्षा करत असून सध्या पावसाला पोषक हवामान निर्माण झाले आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर विर्दभात उष्णतेच्या लाटेच्या इशारा देण्यात आला असून काही भागात मेघगर्जना आणि विजाच्या कडकडाटात गारपीटीसह पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. तर पुढील पाच दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी हजेरी लावतील, अशी शक्यता हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे..आज पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम पावसाचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, नंदुरबार, धुळे जिल्ह्यांत काही ठिकाणी हलका ते मध्यम सरी हजेरी लावण्याची शक्यता असून जळगाव, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत हलक्या सरींचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे..Maharashtra Weather Update: राज्यात पावसाला पोषक हवामान.मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज असून हिंगोली, परभणी, जालना जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा जिल्ह्यांत काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून तुरळक ठिकाणी विजा आणि वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे..तर अकोला जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जेनेसह पावसाची शक्यता असून तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच अमरावती जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी गारपीटीसह वादळी पावसाचा इशार असून भंडारा, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यांत काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेसह तुरळक ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.