Maharashtra Weather Update: नैॡत्य मोसमी वाऱ्यांची (मॉन्सून) अरबी समुद्रावरून जवळपास १५ दिवस अडखळलेली वाटचाल पुन्हा सुरू झाली आहे. सोमवारी (ता. २२) मॉन्सूनने कोकणातील अलिबाग, मध्य महाराष्ट्रातील पुणे, मराठवाड्यातील धाराशिव, लातूर पर्यंत मजल मारली आहे. प्रगतीस पोषक वातावरण असल्याने मॉन्सून मुंबईसह महाराष्ट्राच्या आणखी काही भागात उद्यापर्यंत (ता. २४) दाखल होण्याची शक्यता आहे. .पेक्षा तीन दिवस लांबल्यानंतर ४ जून रोजी मॉन्सून देवभूमी केरळमध्ये डेरे दाखल झाला. प्रवाहांची गती वाढल्याने ६ जून रोजी मॉन्सून एक्सप्रेस महाराष्ट्रात दाखल झाली. ८ जून रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे आणि मध्य महाराष्ट्रातील सोलापूरपर्यंत मॉन्सूनने मजल मारली..Monsoon Update: विदर्भात पावसाची शक्यता; राज्यात उन्हाचा चटका कायम, मॉन्सून 'जैसे थे'.त्यानंतर मात्र अरबी समुद्रावरून मॉन्सूनची चाल थांबली होती. तब्बल दोन आठवड्यानंतर सोमवारी (ता. २२) पुढे चाल करत मॉन्सूनने कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात प्रगती केली आहे..Monsoon Update : खुशखबर! मॉन्सूनने पुण्यापर्यंत मजल मारली; दोन आठवड्यांनंतर मॉन्सूनची आगेकूच.सोमवारी (ता. २२) मॉन्सूनने संपूर्ण कर्नाटक, मध्य अरबी समुद्र, महाराष्ट्र, तेलंगणा, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड आणि बिहारच्या काही भागात प्रगती केली आहे. मॉन्सूनने अलिबाग, पुणे, निजामाबाद, दांतेवाडा, बलांगिर, सुंदरगड, गया, मुझफ्फरपूर पर्यंत मजला मारली आहे..उद्यापर्यंत (ता. २४) मुंबईसह महाराष्ट्राचा आणखी काही भाग, संपूण तेलंगणा, ओडिशा तसेच छत्तीसगड, झारखंड, बिहारच्या आणखी काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.