Maharashtra Rain Alert : विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार बरसणार ; हवामान विभागाचा अंदाज

Rain Forecast : कोकण, घाटमाथ्यावर पावसाची रिपरिप वाढत आहे. राज्यातही पावसाला पोषक हवामान होऊ लागले आहे.
Rain Update
Rain Update Agrowon
Published on
Updated on

Pune News : कोकण, घाटमाथ्यावर पावसाची रिपरिप वाढत आहे. राज्यातही पावसाला पोषक हवामान होऊ लागले आहे. आज (ता. २) सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा, तर विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

सोमवारी (ता. १) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील पालघर आणि नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाने हजेरी लावली. तर विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यासह तुरळक ठिकाणी जोरदार पावसाने हेजरी लावली. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळल्या. पालघर जिल्ह्यातील जव्हार येथे सर्वाधिक ११२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

Rain Update
Weather Update : विदर्भात जोरदार पावसाची शक्यता

गुजरातच्या किनाऱ्यालगतच्या अरबी समुद्रापासून बिहार पर्यंत समुद्र सपाटीपासून ५.८ हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. मध्य प्रदेश आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. महाराष्ट्र ते केरळ किनाऱ्याला लागून हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा कायम असल्याने राज्यात ढगाळ हवामान होत आहे.

आज (ता. २) सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह नाशिक, पुणे कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा, तर विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) कायम असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

मॉन्सून देश व्यापणार

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची (मॉन्सून) वाटचाल सुरूच असून, सोमवारी (ता. १) संपूर्ण चंडीगडसह राजस्थान, हरियाणा, आणि पंजाबच्या आणखी काही भागात प्रगती केली आहे. दोन दिवसांत उर्वरित राजस्थान, हरियाणा आणि पंजाबसह संपूर्ण देश मान्सूनच्या छायेखाली येण्यास पोषक हवामान आहे.

Rain Update
Weekly Weather : हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता

रविवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलीमीटरमध्ये) :

कोकण :

पालघर : जव्हार ११२, मोखाडा १०८, विक्रमगड ९८, वाडा १०४.

रायगड : म्हसळा ४३, पनवेल ४१, तळा ७९.

रत्नागिरी : मंडणगड ४०, संगमेश्वर ४०.

सिंधुदुर्ग : आवळेगाव ४५, दोडामार्ग ५४, मुलदे (कृषी) ४२, सावंतवाडी ५०.

ठाणे : आंबरनाथ ४६, मुरबाड ५७.

मध्य महाराष्ट्र :

जळगाव : धरणगाव ३२.

कोल्हापूर : आजरा ४२, चंदगड ४५, गगनबावडा ४६, राधानगरी ५५, शाहूवाडी ३८.

नंदूरबार : तळोदा ३०.

नाशिक : हर्सूल ७३, इगतपुरी ११०, नाशिक ४०, ओझरखेडा ५५, पेठ ८६, पिंपळगाव बसंवत ३८, त्र्यंबकेश्वर ८३, येवला ३५.

पुणे : लोणावळा कृषी ५४, वेल्हे ५५.

सातारा : महाबळेश्वर १०६.

मराठवाडा :

छत्रपती संभाजीनगर : सोयगाव २०.

हिंगोली : औंढा नागनाथ २४, कळमनुरी २२, तोंडापूर २१, वसमत २७.

जालना : मंथा ३०, पातूर ३९.

लातूर : चाकूर २०, जळकोट ३५, रेणापूर २१, उदगीर ३८.

नांदेड : अर्धापूर २८, भोकर ४४, बिलोली ३८, देगलूर ३३, धर्माबाद २१, हादगाव ३५, हिमायतनगर २६, किनवट २०, लोहा २०, मुदखेड २१, मुखेड २१, नायगाव खैरगाव ३९.

परभणी : जिंतूर २२, पालम ५२, पूर्णा २०.

विदर्भ :

अमरावती : चांदूर रेल्वे २४, धामणगाव रेल्वे ३२.

गडचिरोली : कोरची २४.

गोंदिया : देवरी २३, सडकअर्जुनी २०.

नागपूर : हिंगणा ४५, कळमेश्वर २१, कामठी ३६, नागपूर ३२, रामटेक ५४, सावनेर २३.

वर्धा : आर्वी २४, देवळी ४६, खारंघा ३०, सेलू ६१, वर्धा ७४.

वाशिम : मंगरूळपीर ३०, मानोरा ४९, वाशिम ३१.

यवतमाळ : अर्णी ६६, बाभुळगाव ५१, दारव्हा ६९, दिग्रस ७८, कळंब ६३, महागाव ३०, नेर ४४, पुसद ५०, राळेगाव २२, उमरेड ३०, यवतमाळ ७१, झारी झामणी ८२.

मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

सातारा.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, कोल्हापूर.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

१०० मिमीपेक्षा जास्त पाऊस पडलेली ठिकाणे :

जव्हार ११२, मोखाडा १०८, वाडा १०४ (जि. पालघर), इगतपुरी ११० (जि. नाशिक).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com