Rain Prediction: राज्यात पावसाने उघडिपी दिली असली तरी घाटमाथ्यासह विविध भागात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी हजेरी लावत आहेत. तर काही भागांत ऊन-सावल्यांचा खेळ सुरूच आहे. आज मराठवाड्यात पावसाचा अंदाज असून दोन जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे..आज हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलक्या विजांसह हलक्या सरींची शक्यता असून उर्वरित राज्यात ऊन-सावल्यांच्या खेळात हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे..Rain Alert: हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता.तर उद्या हिंगोली, परभणी, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांत विजांसह पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. तसेच उर्वरित राज्यात हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे..गंगीय पश्चिम बंगाल आणि लगतचा उत्तर किनारी ओडिशा तसेच वायव्य बंगालच्या उपसागरात असलेलं ठळक कमी दाबाचं क्षेत्र याच भागात कायम आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राशी संबंधित चक्राकार व्याऱ्याची स्थिती निर्माण झाली असून समुद्रसपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीपर्यंत विस्तारलेली आहे. हे कमी दाबाचं क्षेत्र पुढील २४ तासांत उत्तर ओडिशा आणि गंगीय पश्चिम बंगालमधून पश्चिम-वायव्य दिशेने सरकण्याची शक्यता आहे..Weekly Weather: राज्यात हलक्या पावसाची शक्यता.समुद्रसपाटीवरील मॉन्सूनचा आस अमृतसर, पतियाळा, नजीबाबाद, बस्ती, गंगीय पश्चिम बंगाल आणि लगतचा उत्तर किनारी ओडिशा व वायव्य बंगालच्या उपसागरातील ठळक कमी दाबाच्या क्षेत्राच्या केंद्रातून पुढे मध्य-पूर्व बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारलेली आहे..तसेच दक्षिण गुजरातपासून या कमी दाबाच्या क्षेत्राशी संबंधित चक्राकार वाऱ्यांपर्यंत एक कमी दाबाचा लांबत पट्टा आहे. तो उत्तर मध्य महाराष्ट्र आणि छत्तीसगडमधून जात असून समुद्रसपाटीपासून सुमारे ५.८ किलोमीटर उंचीवर आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसात विदर्भात पावसाला पोषक स्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.