Maharashtra Weather Update: राज्यात थंडीचा कडाका वाढत असतानाच 'अक्वान' चक्रीवादळामुळे अंशत: ढगाळ हवामान निर्माण झाले आहे. त्यामुळे तापमानात चढ-उतार सुरु आहेत. आज म्हणजेच गुरुवारी राज्यात ढगाळ हवामान राहण्याचा अंदाज असून अक्वान चक्रीवादळामुळे शनिवार म्हणजेच २१ नोव्हेंबरपासून विदर्भात पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे..बंगालच्या उपसागरातील पश्चिम-मध्य भागावर असलेले ‘अक्वान’ तीव्र चक्रीवादळ गेल्या सहा तासांत ताशी १२ किलोमीटर वेगाने उत्तरेकडे सरकले आहे. गुरुवारी पहाटे ५.३० वाजता हे चक्रीवादळ १४.५ अंश उत्तर अक्षांश आणि ८५.३ अंश पूर्व रेखांशावर केंद्रित होते..Rain Update: दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात हलक्या सरींचा अंदाज.त्यावेळी हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशातील नरसापूरपासून ४४० किलोमीटर पूर्व-आग्नेयेला, कलिंगपट्टणमपासून ४४० किलोमीटर दक्षिण-आग्नेयेला, तमिळनाडूतील चेन्नईपासून ५८० किलोमीटर पूर्व-ईशान्येला, ओडिशातील गोपालपूरपासून ५३० किलोमीटर दक्षिणेला आणि पुरीपासून ५९० किलोमीटर दक्षिणेला होते..Maharashtra Rain Update: मुरासू चक्रीवादळामुळे पावसाचा अंदाज; तीन दिवस कोणत्या भागात पाऊस पडणार? .अक्वान चक्रीवादळ वायव्य दिशेकडे सरकण्याची शक्यता असून शुक्रवारी दुपारपर्यंत नरसापूर ते पुरीदरम्यान गोपालपूरच्या पूर्वेकडून उत्तर आंध्र प्रदेश, यानम आणि दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. त्यावेळी वाऱ्यांचा कमाल वेग ताशी ९० ते १०० किलोमीटर राहण्याची शक्यता असून वाऱ्यांचे झोत ताशी ११० किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतात..राज्यात मागील चोवीस तासात रत्नागिरी येथे उच्चांकी ३५.१ अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद झाली. तर यवतमाळ येथे निच्चांकी ११ अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद झाली. राज्यात तापमानात चढ-उतार सुरूच राहण्याचा अंदाज आहे. तर शनिवारपासून विदर्भात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाजही हवामानशास्त्र विभागाने दिला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.