Maharashtra Climate Update: राज्यात ऑक्टोबर हिटचा चटका तापदायक ठरत आहे. बहुतांश ठिकाणी उन्हाचा पारा पस्तीशीच्या पार आहे. त्यामुळे उकाडाही जाणवत आहे. मागील चोवीस तासात दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या सरींनी हजेरी लावली. आज म्हणजेच २४ ऑक्टोबर रोजी कोकणात उष्ण दमट हवामानाचा इशारा देण्यात आला असून काही भागात पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे..कोकणात पुढील तीन दिवस उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा देण्यात आला असून आज पालघर, ठाणे, मुंबई, रायगड जिल्ह्यांत उन्हाचा चटका तापदायक ठरण्याचा अंदाज आहे. तर सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा, कोल्हापूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी हजेरी लावण्याची शक्यता आहे. सातारा, सातारा घाटमाथा आणि रायगड जिल्ह्यांत गडगडाटासह हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे..Maharashtra Weather Update: उत्तर कोकणात उष्ण, दमट हवामान शक्य; रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूरमध्ये विजांसह पावसाचा अंदाज.तर उद्या म्हणजेच २५ ऑक्टोबर रोजी पालघर, ठाणे, मुंबई, रायगड जिल्ह्यांत उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज आहे. तर उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. .Maharashtra Weather Alert: कोकणात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज; काही भागात पावसाची शक्यता .हवामानशास्त्र विभागाने पाच दिवसांचा अंदाज जाहीर केला आहे. रविवार, सोमवार आणि मंगळवार निरभ्र आकाशामुळे उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे. तर बुधवारी काही भागात पावसाच्या हलक्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज आहे. .राज्यात मागील चोवीस तासात अमरावती येथे उच्चांकी ३७.४ अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद झाली. तर यवतमाळ येथे निच्चांकी १७.२ अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद झाली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.