Maharashtra Weather Forecast: राज्यात पुढील पाच दिवस उष्णतेच्या चटक्यासह काही भागांत पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. आज विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेसह मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गडचिरोली, भंडारा आणि अमरावती जिल्ह्यांतही उष्णतेच्या लाटेसह मेघगर्जना आणि हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. गोंदिया व यवतमाळ जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वाऱ्यांसह तुरळक ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहणार असून काही ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात..दरम्यान, शुक्रवारी मॉन्सूनची वाटचाल स्थिर राहिली. मात्र पुढील दोन ते तीन दिवसांत नैऋत्य मॉन्सूनच्या पुढील प्रगतीसाठी हवामान अनुकूल असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. त्यामुळे मॉन्सून अरबी समुद्राच्या नैऋत्य व आग्नेय भागातील आणखी काही क्षेत्रांमध्ये, लक्षद्वीप परिसरात तसेच बंगालच्या उपसागराच्या नैऋत्य, मध्य-पश्चिम, पूर्व-मध्य आणि ईशान्य भागातील काही क्षेत्रांत पुढे सरकण्याची शक्यता आहे..Maharashtra Rain Forecast: विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता.यंदाच्या मॉन्सून हंगामात (जून ते सप्टेंबर) देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता असून, एकूण पर्जन्यमान दीर्घकालीन सरासरीच्या केवळ ९० टक्के राहण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय मोहपात्रा यांनी शुक्रवारी (ता. २९) मॉन्सून हंगामाचा सुधारित अंदाज जाहीर केला..हवामान विभागानुसार देशभरात सरासरीपेक्षा कमी किंवा अत्यल्प पाऊस पडण्याची शक्यता तब्बल ८४ टक्के आहे. तर सरासरी पावसाची शक्यता केवळ १४ टक्के असून, सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता अत्यंत कमी आहे. जून महिन्यातही देशभरात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज असून, उत्तर-पश्चिम भारत, उत्तर-पूर्व भारत आणि दक्षिण द्वीपकल्पातील काही भाग वगळता बहुतांश प्रदेशात पावसाची तूट राहू शकते..Vidarbha Monsoon 2026 : मॉन्सून हंगामात पश्चिम विदर्भात कमी पावसाचा अंदाज; तर पूर्व विदर्भात सरासरी पावसाची शक्यता.उत्तर-पूर्व भारतात पावसाचे प्रमाण सरासरी राहण्याची शक्यता असली तरी मध्य भारत, दक्षिण द्वीपकल्पीय भारत आणि उत्तर-पश्चिम भारतात पाऊस कमी राहू शकतो. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये जून महिन्यात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव जाणवण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे..प्रशांत महासागरातील स्थिती हळूहळू एल निनोकडे सरकत असून, जूनपर्यंत एल निनोची शक्यता ८२ टक्क्यांपर्यंत आणि जुलै-ऑगस्टमध्ये ९० टक्क्यांहून अधिक राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे मॉन्सूनवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे..महाराष्ट्रातही सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता अधिक आहे. मराठवाड्यात पावसाची तूट राहण्याचा अंदाज असून, विदर्भातील काही जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी ते लक्षणीय कमी पाऊस पडू शकतो. पश्चिम विदर्भात तूट अधिक राहण्याची शक्यता आहे..मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडू शकतो, तर दक्षिण महाराष्ट्रातील काही भाग आणि पश्चिम घाटालगतच्या परिसरात सरासरी पावसाची शक्यता आहे. कोकणात मोठी पावसाची तूट दिसत नसली तरी सरासरीपेक्षा जास्त पावसाचे स्पष्ट संकेत नसल्याचे हवामान विभागाच्या अंदाजातून दिसून येते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.