Maharshtra Rain Forecast: राज्यात मॉन्सूनच्या परतीच्या सरी काही भागात हजेरी लावत आहेत. परंतु बहुतांश भागात उघडीप कायम असून ऑक्टोबर हिटचा चटका जाणवत आहे. उत्तर भारतातील आणखी काही भागासह महाराष्ट्रातील काही भागातून मॉन्सून परतीसाठी पोषक हवामान आहे. आज म्हणजेच १ ऑक्टोबर रोजी कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता असून उर्वरित राज्यात मात्र उघडीप राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे..आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथ्यासह सांगली जिल्ह्यांत विजांसह पावसाचा अंदाज आहे. तर नाशिक घाटमाथा, नाशिक, अहिल्यानगर, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा आणि पुणे जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता असून उर्वरित राज्यात पावसाची दडी कायम राहील, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे..Maharashtra Rain Update: कोकण, घाटमाथा, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज.हवामानशास्त्र विभागाने पुढील चार दिवसांचा अंदाजही जाहीर केला आहे. उद्या म्हणजेच शुक्रवारी पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथ्यासह सांगली, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता आहे. तर शनिवारी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सांगली, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथ्यावर विजांसह हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता आहे. .Maharshtra Rain Update: कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाचा अंदाज .रविवारी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सांगली, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथ्यावर विजांसह हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता असून उर्वरित राज्यात उघडीप राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. तसेच सोमवारी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथ्यावर विजांसह हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता आहे. परंतु या सरी सर्वदूर हजेरी लावण्याची शक्यता कमीच आहे. .मॉन्सूनच्या परतीची रेषा सध्या गुरुदासपूर, चंदीगड, मुझफ्फरनगर, अलीगड, धौलपूर, उदयपूर, डीसा, नलिया या भागातून जात आहे. तर पुढील ४८ तासांत पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेशातील उर्वरित भाग, गुजरात आणि मध्य प्रदेशातील बहुतांश भाग, तसेच संपूर्ण जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या भागांतून मॉन्सूनच्या परतीसाठी परिस्थिती अनुकूल आहे. तसेच बिहार, झारखंड, छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या काही भागांतूनही मॉन्सूनच्या परतीसाठी पोषक स्थिती निर्माण झाल्याचे हवामानशास्त्र विभागाने जाहीर केले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.