Maharashtra Cold Wave: राज्यात गुलाबी थंडीची चाहूल लागली असून उत्तर महाराष्ट्रात थंडीच्या लाटेनं हुडहुडी वाढली आहे. मराठवाड्यात अंशत: ढगाळ हवामानामुळे तापमानात चढ-उतार सुरु आहेत. आज म्हणजेच शनिवारी मराठवाडा तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे..आज म्हणजेच शनिवारी नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यांत हलक्या सरी शक्य आहेत. तर उर्वरित भागात अंशत: ढगाळ हवामानाचा अंदाज आहे. काल दक्षिण ओडिशाच्या किनारी भागावर असलेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र जवळपास उत्तरेकडे सरकले आहे..Maharashtra Weather Update: अंशतः ढगाळ हवामानासह तापमानात-चढ उतार शक्य.काल संध्याकाळी ५.३० वाजता त्याची तीव्रता कमी होऊन दक्षिण ओडिशावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले. त्यानंतर रात्री ११.३० वाजता मध्य ओडिशावर त्याचे स्पष्ट कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर झाले. आज पहाटे ५.३० वाजता हे क्षेत्र उत्तर अंतर्गत ओडिशावर सरकल्यानंतर त्याची तीव्रता आणखी कमी होऊन कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले..Maharashtra Climate Update: राज्यात तापमानात चढ-उतार शक्य.या कमी दाबाच्या क्षेत्राशी संबंधित चक्राकार वाऱ्यांची स्थिती समुद्रसपाटीपासून ४.५ किलोमीटर उंचीपर्यंत सक्रिय असून, उंचीनुसार ती नैऋत्य दिशेकडे झुकलेली आहे. तसेच मराठवाडा आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे..राज्यात मागील चोवीस तासात रत्नागिरी येथे उच्चांकी ३४.२ अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद झाली. तर जळगाव येथे निच्चांकी ८ अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद झाली. त्याखालोखाल उत्तर महाराष्ट्रात नाशिक १० अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यातही किमान तापमानात चढ-उतार सुरु आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.