Maharashtra Rain Prediction: राज्यात काही भागात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी हजेरी लावत आहे. परंतु या सरी सर्वदूर नाहीत. तर काही भागात पावसाची उघडीप कायम आहे. आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. .आज म्हणजेच ३० सप्टेंबर रोजी ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक घाटमाथा, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, पुणे, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत विजांसह पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. तर पालघर, नाशिक, मुंबई, सोलापूर जिल्ह्यांत विजांसह तर धुळे, नंदुरबार, जळगाव, बीड, धाराशिव जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या सरी हजेरी लावतील, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे..Maharashtra Rain Forecast: कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाचा अंदाज.उद्या म्हणजे गुरुवारी नाशिक, नाशिक घाटमाथा, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, अहिल्यानगर जिल्ह्यांत विजांसह हलक्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. परंतु या सरी सर्वदूर हजेरी लावण्याची शक्यता कमीच आहे. तर बहुतांश भागात ऊन सावल्यांचा खेळ अनुभवायला मिळण्याची शक्यता आहे..Rain Update : कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता; उन्हाचा चटका वाढला.काल म्यानमारच्या किनारी भागात, त्याला लागून असलेल्या ईशान्य बंगालच्या उपसागरात आणि आग्नेय बांगलादेशावर निर्माण झालेले दाबाचे क्षेत्र उत्तर दिशेने सरकले आहे. आज सकाळी हे क्षेत्र उत्तर म्यानमार, त्याला लागून असलेला आग्नेय बांगलादेश, मिझोराम आणि ईशान्य बंगालच्या उपसागराच्या परिसरात ठळक कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतरित झाले. पुढील काळात ते उत्तर दिशेने मिझोराम, त्रिपुरा आणि त्याला लागून असलेल्या आग्नेय बांगलादेशाच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. बांगलादेशाच्या किनाऱ्याकडे जाताना ते विरून जाणार आहे..मॉन्सूनने राजधानी दिल्लीसह राजस्थान, पंजाब, हरियानाच्या बहुतांश, तर गुजरात, उत्तर प्रदेशच्या काही भागातून माघार घेतली असून, आजही मॉन्सूनच्या परतीची सीमा कायम होती. आज मॉन्सूनच्या परतीची सीमा गुरुदासपूर, चंदीगड, मुझफ्फरनगर, अलीगड, धौलपूर, उदयपूर, डीसा, नलिया भागात कायम आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.