Maharashtra Weather Forecast: राज्यात मॉन्सूनच्या पावसाचा जोर ओसरला असून तुरळक ठिकाणी ऊन-सावल्यांच्या खेळात हलक्या ते मध्यम सरी हजेरी लावत आहेत. परंतु या सरी सर्वदूर नाहीत. अनेक भागात अंशत: ढगाळ हवामानात पावसाची उघडीप पाहायला मिळत आहे. .मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांसह हलक्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज आहे. आज धुळे, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या सरीची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात ऊन-सावल्यांच्या खेळात पावसाच्या हलक्या सरी लावण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे..Marathwada Rain Forecast: मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता.हवामानशास्त्र विभागाने पुढील पाच दिवसांचा अंदाज जाहीर केला आहे. शनिवारी नांदेड, लातूर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता आहे. तर रविवारी धुळे, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या सरींचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. .तसेच सोमवारी अहिल्यानगर जिल्ह्यांत विजांसह हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता आहे. तर मंगळवारी राज्यात ढगाळ हवामानासह काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. तर काही भागात ऊन-सावल्यांच्या खेळात हलक्या सरी विविध भागात हजेरी लावण्याचा अंदाज आहे.परंतु पुढील पाच दिवस सर्वदूर पाऊस हजेरी लावण्याची शक्यता कमीच आहे..Maharashtra Rain Update: राज्यात पावसाची उघडीप राहणार? .सध्या मॉन्सूनचा आस अमृतसर, मुझफ्फरनगर, कानपूर, ईशान्य मध्य प्रदेशातील कमी दाबाचे केंद्र, दाल्तगंज, दिघा ते पुढे ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. तसेच दक्षिण-पश्चिम मध्य प्रदेशात समुद्रसपाटीपासून ३.१ ते ४.५ किलोमीटर उंचीच्या दरम्यान चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे..मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा ईशान्य मध्य प्रदेश आणि लगतच्या भागात आज सकाळी साडेआठ वाजता त्याच भागात सक्रिय होता. या कमी दाबाच्या क्षेत्राशी संबंधित चक्राकार वाऱ्यांची स्थिती समुद्रसपाटीपासून ४.५ किलोमीटर उंचीपर्यंत विस्तारली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.